ETV Bharat / state

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर नाकाबंदी दरम्यान सापडली 50 लाखांची रोकड; वाहनचालक ताब्यात - 50 Lakh Cash Seized - 50 LAKH CASH SEIZED

50 Lakh Cash Seized : पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं नाकाबंदी लावलीय. या नाकाबंदीत तपासणी दरम्यान एका वाहनातून 50 लाखांची रोकड मंगळवारी रात्री जप्त केली.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर नाकाबंदी दरम्यान सापडली 50 लाखांची रोकड; वाहनचालक ताब्यात

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 27, 2024, 10:03 AM IST

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर नाकाबंदी दरम्यान सापडली 50 लाखांची रोकड

पिंपरी चिंचवड 50 Lakh Cash Seized : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील उर्से टोल नाक्याजवळ नाकाबंदी दरम्यान पिंपरी चिंचवड शहर पोलिसांना एका स्कॉर्पिओ गाडीत 50 लाखांची रोकड सापडल्यानं खळबळ उडालीय. देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता सुरु असतांना ही रोकड सापडल्यानं सर्वत्र चर्चा होत आहे.

गाडीत आढळली 50 लाखांची रोकड : पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत 9 ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली. नाकाबंदी दरम्यान मंगळवारी रात्रीच्या सुमारास उर्से टोल नाक्यावर शिरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी वाहनांची तपासणी करत होते. तपासणी दरम्यान पोलिसांना एका स्कॉर्पिओतील प्रवाशांवर संशय आला. या गाडीची तपासणी केल्यावर पोलिसांना स्कॉर्पियो गाडीत तब्बल 50 लाख रुपये रोख रक्कम आढळून आली. पोलिसांनी लागलीच वाहनचालकाला ताब्यात घेत विचारपूस केली. मात्र चौकशीत संबंधित व्यक्ती उडवाउडवीची उत्तरे देत होता. 50 लाख रोकड किंमतीचा योग्य खुलासा संबंधित व्यक्तीला करता आला नाही. त्यामुळं ही रक्कम पोलिसांनी जप्त केलीय.

पोलिसांचा शोध सुरु : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही स्कॉर्पिओ पुणे शहरातील आहे. ही रक्कम नेमके कुठे नेण्यात होते? याचा तपास पिंपरी चिंचवड पोलीस करत आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठी रक्कम आढळल्यानं पुणे जिल्ह्यात खळबळ उडालीय. पुण्यातील मावळ तालुक्यात येणाऱ्या उर्से टोल नाक्यावर सापडलेली ही रक्कम नेमकी कोणत्या कारणास्तव गाडीमध्ये ठेवली होती? यात कुणी राजकीय व्यक्तीचं नाव समोर येतं का? याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. मावळ मतदार संघात अद्याप कोणत्याही उमेदवाराची घोषणा झालेली नाही. महायुती आणि महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार प्रचाराचा नारळ फोडत प्रचार करत आहेत. मात्र, उमेदवार ठरलेला नसताना त्याआधीच इतक्या मोठ्या प्रमाणात रोकड आढळून आल्यानं पोलीस दलही सतर्क झालंय.

हेही वाचा :

  1. 10 Lakh Cash Seized: लोकसभा निवडणूक जाहीर होताच सिंधुदुर्गमध्ये 10 लाखांची रोकड जप्त, पोलिसांचा तपास सुरू
  2. दुय्यम निबंधकाच्या घरी लाचलुचपत विभागाला सापडली कोट्यवधींची माया

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.