ETV Bharat / state

कुर्ला विधानसभा मतदारसंघातील ठाकरेंच्या संभाव्य उमेदवाराला स्थानिकांचा विरोध, नेमकं कारण काय? - KURLA ASSEMBLY CONSTITUENCY

कुर्ला विधानसभा मतदारसंघात ठाकरेंच्या माजी नगरसेविका प्रविणा मोरजकर तयारीला लागल्या असून, प्रविणा यांना उमेदवारी दिल्यास त्यांना मतदान न करण्याचा निर्णय स्थानिक नागरिकांनी घेतलाय.

Former corporator Pravina Morajkar
माजी नगरसेविका प्रविणा मोरजकर (ETV Bharat FIle Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 21, 2024, 9:18 PM IST

Updated : Oct 21, 2024, 10:03 PM IST

मुंबई : विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं असून, अनेक पक्षांनी उमेदवार देण्यास सुरुवात केलीय. भाजपानंही पहिली यादी जाहील केलीय, अशातच आता विविध मतदारसंघातील अंतर्गत गटबाजी समोर येत आहे. कुर्ला विधानसभा मतदारसंघातही असाच प्रकार पाहायला मिळत आहे. सध्या इथे शिवसेना शिंदे गटाचे मंगेश कुडाळकर विद्यमान आमदार असून, महविकास आघाडीत ही जागा शिवसेना ठाकरे गटाला जाण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यामुळेच कुर्ला विधानसभा मतदारसंघात ठाकरेंच्या माजी नगरसेविका प्रविणा मोरजकर तयारीला लागल्या असून, प्रविणा यांना उमेदवारी दिल्यास त्यांना मतदान न करण्याचा निर्णय कुर्ला कुरेशीनगर येथील स्थानिक नागरिकांनी आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेतलाय.

ठाकरे गटाला मुस्लिम समाजाची मतं: या आधी प्रविणा मोरजकर यांना उमेदवारी देण्यास कुर्ल्यातील मराठा समाजाने विरोध केला होता. आता कुरेशीनगर येथील नागरिकांनी विरोध केल्याने प्रविणा मोरजकर यांची उमेदवारी धोक्यात आल्याचं बोललं जातंय. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला मुस्लिम समाजाची मोठ्या प्रमाणात मतं मिळाली होती. वर्षानुवर्षे ठाकरेंपासून लांब असणाऱ्या मुस्लिम समाजाने लोकसभा निवडणुकीत ठाकरेंना साथ दिलीय. मात्र, विधानसभा निवडणुकीत हाच मुस्लिम समाज ठाकरेंपासून दूर जाण्याची चिन्हं आहेत.

मोरजकरांना उमेदवारी दिल्यास त्यांचा प्रचार करणार नाही : यासंदर्भात ईटीव्ही भारतशी बोलताना काँग्रेसच्या कुर्ला विभागाचे उपाध्यक्ष नबी रहीम खान म्हणाले की, कुरेशीनगरमधील आम्ही रहिवासी मागील 60 वर्षांपासून ज्या रस्त्याचा वापर करीत आहोत. तो रस्ता प्रविणा मोरजकर यांनी आपल्या राजकीय दबाव वापरून इथल्या एका बांधकाम व्यावसायिकाला दिलाय. या रस्त्याचा मागील 60 वर्षांपासून आम्ही वापर करीत होतो. विशेष म्हणजे हा ये-जा करण्याचा मुख्य रस्ता होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी प्रविणा मोरजकर यांना कुर्ला विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देऊ नये, त्यांनी प्रविणा मोरजकर यांना उमेदवारी दिल्यास आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही. स्थानिक महाविकास आघाडीतील नेतेदेखील या निवडणुकीत त्यांचा प्रचार करणार नाहीत," अशी भूमिका इथल्या स्थानिक नेत्यांनी घेतलीय.

हेही वाचा...

  1. " जागावाटप उद्या होणार, महाविकास आघाडीपेक्षा महायुती..."-नाना पटोले
  2. महाराष्ट्रातील राजकारणात महिलांना दुय्यम स्थान; 'महिलाराज' फक्त नावालाच, जाणून घ्या आकडेवारी

Last Updated : Oct 21, 2024, 10:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.