ETV Bharat / state

विधानसभेसाठी मनसेच्या संभाव्य उमेदवारांची पहिली यादी 'ईटीव्ही भारत'च्या हाती; जाणून घ्या संपूर्ण लिस्ट - MNS Candidates List - MNS CANDIDATES LIST

MNS Candidates List Assembly Election : विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काहीच महिने बाकी राहिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. उमेदवारी न मिळण्यावरुन आता रुसवे फुगवेही पाहायला मिळणार आहेत. अशातच आता मनसेच्या (MNS) संभाव्य उमेदवारांची यादी 'ईटीव्ही भारत'च्या हाती लागली आहे. जाणून घ्या संपूर्ण यादी....

mns
विधानभवन आणि राज ठाकरे (ETV Bharat MH Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 26, 2024, 4:05 PM IST

Updated : Jul 26, 2024, 5:09 PM IST

मुंबई MNS Candidates List Assembly Election : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष पक्षांतर्गत संपूर्ण राज्यभरात चाचपणी करत आहेत. कोणत्या जागा लढवायच्या आणि कोणत्या जागा मित्र पक्षांना सोडायच्या याबाबत जोरदार खलबतं सुरू आहेत. अशातच गुरुवारी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपण आगामी विधानसभा निवडणुकीत 225 ते 250 जागा लढवणार असल्याचं जाहीर केलं. आपण सध्या विविध जागांची चाचपणी करत असल्याचं देखील राज ठाकरे यावेळी म्हणाले होते. आता यातील जवळपास 35 जागांवरचे संभाव्य उमेदवार निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे. या 35 विधानसभा जागेवरील संभाव्य उमेदवारांची यादी 'ईटीव्ही भारत'च्या हाती लागली आहे.

दिग्गज उतरणार निवडणुकीच्या रिंगणात : मुंबईतील 36 विधानसभा जागेवर मनसेचे आतापर्यंत 16 संभाव्य उमेदवार ठरले आहेत. यात शिवडी विधानसभेतून मनसेचे नेते बाळा नांदगावकर तर, बहुचर्चित अशा वरळी विधानसभेतून आदित्य ठाकरे यांच्याविरोधात संदीप देशपांडे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती मिळत आहे. माहीम विधानसभा मतदारसंघातून नितीन सरदेसाई निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिल्यानं नाराज झालेले मनसेचे कोकणातील नेते वैभव खेडेकर यांना खेड-दापोली-मंडणगड विधानसभेची उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

मुंबईतील 36 विधानसभा जागांवर 16 संभाव्य उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे -

1) शिवडी - बाळा नांदगावकर
2) भायखळा - संजय नाईक
3) वरळी - संदीप देशपांडे
4) माहीम - नितीन सरदेसाई
5) चेंबूर - माऊली थोरवे
6) घाटकोपर पश्चिम - गणेश चुक्कल
7) विक्रोळी - विश्वजित ढोलम
8) मुलुंड - सत्यवान दळवी/राजेश चव्हाण
9) भांडुप - शिरीष सावंत/योगेश सावंत/संदीप जळगावकर/अतिषा माजगावकर
10) कलिना - संदीप हटगी/संजय तुरडे
11) चांदिवली - महेंद्र भानुशाली
12) जोगेश्वरी - शालिनी ठाकरे
13) दिंडोशी - भास्कर परब
14) गोरेगाव - वीरेंद्र जाधव
15) वर्सोवा - संदेश देसाई
16) मागाठणे - नयन कदम

कोकणातून खेड-दापोली-मंडणगड विधानसभा जागेसाठी वैभव खेडेकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोकण, पुणे आणि ठाणे विभागातील संभाव्य उमेदवार : कोकणातील खेड-दापोली-मंडणगड विधानसभा जागेसाठी वैभव खेडेकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. तर, भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून शैलेश बिडवे यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. नवी मुंबई विधानसभा मतदारसंघातून गजानन काळे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. पुण्यात मनसेत दोन गट पडले आहेत. पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघात साईनाथ बाबर यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे.

हेही वाचा -

  1. राज ठाकरे यांचं मत परिवर्तन होईल : मंत्री दीपक केसरकरांनी केला 'हा' दावा - Deepak Kesarkar On Raj Thackeray
  2. "लाडका भाऊ-लाडकी बहीण आतापर्यंत एकत्र राहिले असते तर..." राज ठाकरेंचा कुणाला टोला? - Raj Thackeray on Assembly election
  3. "...तर जातीच्या नावावर रक्तपात सुरू होईल, विधानसभा निवडणुकीत मी रशिया युक्रेनचा प्रचार करणार"; राज ठाकरे असं का म्हणाले? - Raj Thackeray

Last Updated : Jul 26, 2024, 5:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.