ETV Bharat / state

भटक्या विमुक्त जमाती संघटना, धनगर समाज, वंजारी समाजाच्यावतीने मविआ उमेदवारांना पाठिंबा, लक्ष्मण माने यांची घोषणा - Lok Sabha Election 2024

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला विविध संस्था आणि संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. दरम्यान भटक्या विमुक्त जमाती संघटना, धनगर समाज, वंजारी समाज या समाजाने मविआला पाठिंबा दर्शविला आहे. माजी आमदार आणि पद्मश्री लक्ष्मण माने यांनी ही माहिती दिली.

Supporting MVA Candidates
लक्ष्मण माने यांची घोषणा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 4, 2024, 6:55 PM IST

महाविकास आघाडीला मिळत असलेल्या पाठिंब्याविषयी बोलताना लक्ष्मण माने

पुणे Lok Sabha Election 2024 : देशभरातील विविध राजकीय पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी केली असून राज्यात महाविकास आघाडी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला विविध संस्था संघटनेचा पाठिंबा मिळत असताना भटक्या विमुक्त जमाती संघटना, धनगर समाज, वंजारी समाज या समाजाच्यावतीनं पद्मश्री माजी आमदार लक्ष्मण माने, अ‍ॅड. माजी आमदार विजय मोरे, अ‍ॅड. माजी आमदार उषा दराडे यांच्या नेतृत्वाखाली भटक्या विमुक्त 'अ', 'ब', 'क', 'ड' या सर्व समाजबांधवांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना सक्रिय पाठिंबा जाहीर केला आहे.

भाजपाला सत्तेतून दूर करण्याचा मानस : पुण्यात आज याबाबत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यात पद्मश्री लक्ष्मण माने आणि अ‍ॅड. विजय मोरे यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी पद्मश्री लक्ष्मण माने म्हणाले की, संपूर्ण राज्यभर ९ एप्रिल ते ९ मे २०२४ या काळात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भटक्या विमुक्तांच्या मेळाव्यांमधून मोठ्या प्रमाणात साजरी केली जाणार आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि अल्पसंख्याक समाजाच्या सर्व बांधवांनी या जयंती महोत्सवात सक्रिय सहभागी व्हावे. भारताची राज्यघटना आणि आपल्याला मिळालेले मूलभूत अधिकार ही आपली कवच कुंडलं आहेत. भारताची राज्यघटना बदलू इच्छिणाऱ्यांना साता समुद्रापार फेकल्याशिवाय आता थांबायचं नाही. संघटितरित्या आरएसएस आणि भाजपाला सत्तेतून दूर केल्याशिवाय थांबवायचं नाही, अशी घोषणा देखील यावेळी पद्मश्री लक्ष्मण माने यांनी केली.

आंबेडकर, आठवले यांना आवाहन : लक्ष्मण माने पुढे म्हणाले की, आम्ही वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना देखील आवाहन करत आहे की, त्यांनी मतांचं विभाजन होईल असं कुठलंही काम करू नये. त्यांनी इंडिया आघाडीत यावं तसंच रामदास आठवले यांना देखील आवाहन आहे की, त्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि संविधान वाचवलं पाहिजे. आठवले यांनी युतीतून बाहेर पडावं आणि सर्वांनी एकत्र येत इंडिया आघाडीत सहभागी व्हावं असं यावेळी माने म्हणाले.

हेही वाचा :

  1. नवनीत राणांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषणातच म्हणाले... - Navneet Rana
  2. "मी रविंद्र धंगेकरांचं दिल्लीला जायचं तिकीट बुक करून ठेवलंय"- सुप्रिया सुळे - SUPRIYA SULE pune news
  3. भाजपानं आयात केलेले भ्रष्ट नेते लोकसभा निवडणुकीत मोदींची वाट लावणार, संजय राऊतांची जहरी टीका - Lok Sabha Election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.