ETV Bharat / state

खाकी वर्दीलाही फुटला पान्हा! भुकेल्या बाळाला दूध पाजणारी 'हिरकणी' महिला पोलीस - constable fed newborn baby - CONSTABLE FED NEWBORN BABY

constable fed newborn baby : महिला पोलीस कर्मचाऱ्याने एका दिवसाच्या अनोळखी भुकेल्या चिमुकलीला स्वतःचं दूध पाजलं. बाळ रडताना पाहून या महिला पोलिसातील ममता जागृत झाली आणि त्यांनी हे पवित्र कार्य केलं. वाचा नेमकं काय घडलं...

भुकेल्या बाळाला दूध पाजणारी 'हिरकणी' महिला पोलीस
भुकेल्या बाळाला दूध पाजणारी 'हिरकणी' महिला पोलीस (ईटीव्ही भारत बातमीदार)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 13, 2024, 10:16 PM IST

Updated : Sep 14, 2024, 9:27 PM IST

बुलढाणा constable fed newborn baby - 'सद् रक्षणाय, खल निग्रहणाय' हे ब्रीदवाक्य घेऊन लोकांच्या रक्षणार्थ पोलीस खाकी घालून आपले कर्तव्य पार पाडत असतात. कधी-कधी पोलिसांना त्यांचा खाक्या दाखवावा लागतो. मात्र या खाकीमध्येही शेवटी एक मनुष्य असून या खाकीत एक वडिलाचं प्रेम, एक आईची 'ममता' लपलेली असते. याचा प्रत्यय बुलढाण्यातील एका घटनेतून आलाय. अवघ्या एक दिवसाच्या भुकेल्या अनोळखी चिमुकलीला बुलढाणा शहर ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याने चक्क आपलं स्वतःचं दूध पाजून त्या चिमुकलीला शांत केलं. या महिला कर्मचाऱ्यानं केलेल्या या कार्यामुळे त्यांचं कौतुक तर होतच आहे. मात्र या प्रकारामुळे खाकीमधली 'ममता' देखील सर्वांसमोर आलीये. अनोळखी एका दिवसाच्या भुकेल्या चिमुकलीला स्वतःचं दूध पाजणाऱ्या या महिला कर्मचाऱ्याचं योगिता शिवाजी डुकरे असं नाव आहे. त्या बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.

लोणार येथून एका इसमाने एका दिवसाच्या चिमुकलीला बुलढाणा येथील अनाथ आश्रमात ठेवण्यासाठी 3 सप्टेंबर रोजी, शनिवारी आणलं होतं. परंतु अनाथ आश्रमाने पोलिसांत तक्रार नोंदवण्यास सांगितलं. दरम्यान हा इसम या चिमुकलीला त्याच दिवशी रात्रीच्या आठ ते साडेआठ वाजेच्या सुमारास बुलढाणा शहर पोलिसात तक्रार द्यायला पोहोचला होता. ही चिमुकली एका वेड्या बाईची असल्याचं सांगून ती मेली असती म्हणून तिला अनाथ आश्रमात टाकण्यासाठी आणल्याचं या इसमानं पोलिसांना सांगितलं. सकाळपासून ही एक दिवसाची चिमुकली या इसमाकडे असल्याने ती उपाशी होती. याच कारणाने ती व्याकुळ होऊन रडत होती. बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कर्मचारी योगिता शिवाजी डुकरे यांनी या चिमुकलीला रडताना पाहताच त्यांच्यामधील 'वात्सल्यभाव' जागृत होवून त्यांना कळलं की ही चिमुकली उपाशी आहे. त्यांनी लगेच परवानगीने या अनोळखी एक दिवसाच्या चिमुकलीला स्वतःचं दूध पाजून शांत केलं. विशेष म्हणजे महिला पोलीस कर्मचारी योगिता शिवाजी डुकरे यांना एक ते दीड वर्षाचं बाळ असल्याने त्यांना ती चिमुकली उपाशी असल्याचं लक्षात आलं.

भुकेल्या बाळाला दूध पाजणारी 'हिरकणी' महिला पोलीस (ईटीव्ही भारत बातमीदार)

बुलढाणा शहर ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांनी त्या चिमुकलीबाबत तपास केला असता ज्या इसमाने त्या चिमुकलीला आणलं होतं त्या इसमाच्या सोळा वर्षीय मुलीची ती चिमुकली असल्याचं स्पष्ट झालं आहे. या प्रकरणात आरोपीविरुद्ध लोणार पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर चिमुकलीला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या या चिमुकलीची परिस्थिती चांगली असून तिचं वजन कमी असल्यामुळे तिला तीन आठवड्यापर्यंत रुग्णालयातच ठेऊन उपचार केले जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी यांनी दिली आहे.

एका अनोळखी एका दिवसाच्या भुकेल्या चिमुकलीला कोणतीही पर्वा न करता महिला पोलीस कर्मचारी योगिता डुकरे यांनी आपलं स्वतःचं दूध पाजल्याने महिला पोलीस कर्मचारी योगिता डुकरे यांचं सर्व स्तरावर कौतुक होत आहे. पोलीस कर्मचारी योगिता डुकरे यांच्या या प्रशंनीय कृतीमुळे पोलीस खात्याची प्रतिमा उंचावली, असं नक्कीच म्हणता येईल.

Last Updated : Sep 14, 2024, 9:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.