मुंबई Minor Disable Girl Sexually Abuse Kandivali : अल्पवयीन दिव्यांग मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना कांदिवली परिसरात घडली. कांदिवलीतील या धक्कादायक घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली. ही घटना मंगळवारी समोर आली असून, आरोपीला पोलिसांनी अटक केलीय. बदलापूरमधील अत्याचाराची घटना ताजी असतानाच मुंबईमध्ये अशा प्रकारच्या घटना आता समोर येत आहेत.
नराधमाचं कृत्य : मुलीचे आई- वडील कामानिमित्त बाहेर गेले होते. हे समजताच आरोपीनं घरात प्रवेश करत अल्पवयीन दिव्यांग मुलीवर अत्याचार केला. याप्रकरणी कुरार पोलिसांनी २३ वर्षीय नराधम आरोपीला अटक केली असल्याची माहिती कुरार पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सागर भोसले यांनी दिली.
आईनं दिली पोलिसात तक्रार : घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळं मुलगी काही दिवस बोलत नसल्यानं आईला शंका आली. त्यानंतर आईनं मुलीला धीर देऊन विचारणा केली असता मुलीनं घडलेला धक्कादायक प्रकार आईला सांगितला. त्यानंतर लगेच कुरार पोलीस ठाण्यात धाव घेतली. आईच्या तक्रारीनंतर कुरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
गुन्हा दाखल करत आरोपीला अटक : २३ वर्षीय आरोपीविरोधात कूरार पोलिसांनी कलम ७४ (विनयभंग) आणि ३३३ (ट्रेसपासिंग) सह बालकांचं लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पॉक्सो) कायद्याच्या कलम ८, १२ अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
नागरिक संतप्त : बदलापूर येथे दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचाराची घटना समोर आली होती. घटनेच्या निषेधार्थ नागरिकांनी बदलापूर रेल्वे स्थानकात रेलरोको आंदोलन केलं होतं. या घटनेनंतर अशा प्रकारच्या अनेक संतापजनक घटना मुंबई, ठाणे, पुणे, अकोला येथून समोर येवू लागल्या आहेत. त्यामुळं पालकांच्या मनातही भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.
हेही वाचा -
- मुंबईकरांचा पुन्हा संताप; नराधमाकडून दोन चिमुकल्या मुलींचा विनयभंग, विवस्त्र होत अत्याचाराचा प्रयत्न - Girl Abused In Mumbai
- सोशल माध्यमांवर झाली ओळख : नराधमानं गुजरातमध्ये नेऊन 13 वर्षीय बालिकेवर केला बलात्कार - Social Media Friend Raped Girl
- शेजारधर्माला काळिमा : 9 वर्षीय चिमुकलीला सार्वजनिक शौचालयात नेऊन दाखवला अश्लील व्हिडिओ, 35 वर्षीय नराधमाकडून लैंगिक अत्याचार - Man Abused 9 Year Girl