ETV Bharat / state

कोकण पदवीधर मतदारसंघाचा उमेदवार सीएम, दोन्ही डीसीएम ठरवणार - रवींद्र चव्हाण - Konkan Graduate Constituency - KONKAN GRADUATE CONSTITUENCY

Konkan Graduate Constituency: कोकण पदवीधर मतदारसंघासाठी भाजपा निवडणूक लढण्यावर ठाम आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या निवासस्थानी आज (29 मे) महत्त्वाची बैठक पार पडली. कोकण पदवीधर मतदारसंघाचा उमेदवार सीएम, दोन्ही डीसीएम ठरवणार असल्याची माहिती मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.

Minister Ravindra Chavan
रवींद्र चव्हाण (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 29, 2024, 9:48 PM IST

मुंबई Konkan Graduate Constituency : महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली असून विधान परिषदेच्या चार जागांसाठी 26 जून रोजी मतदान होणार आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर तर मुंबई, नाशिक शिक्षक मतदार संघासाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष कामाला लागले. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या मनसेने कोकण पदवीधर मतदारसंघातून आपला उमेदवार जाहीर केला आहे.

रवींद्र चव्हाण विधान परिषद निवडणुकीविषयी बोलताना (ETV Bharat Reporter)

या चार जागांसाठी होणार निवडणूक : मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, नाशिक शिक्षक आणि कोकण पदवीधर मतदार संघाच्या विधानपरिषदेच्या चार जागांकरिता निवडणूक होत आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या मनसेने देखील कोकण पदवीधर मतदारसंघातून अभिजीत पानसे यांना उमेदवार जाहीर केली आहे. मात्र, या मतदारसंघासाठी भाजपा देखील आग्रही आहे. या मतदारसंघातून भाजपाचे निरंजन डावखरे गेल्या दोन टर्मपासून आमदार होते. त्यांची जागा रिक्त झाल्यानंतर कोकणातील सर्व भाजपा जिल्हाध्यक्षांची मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली.

महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणणार : विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक होत आहे. त्याकरता आज सर्व पदाधिकाऱ्यांसोबत बैठक बोलावली होती. आमची नोंदणी देखील मोठ्या प्रमाणात झालेली आहे. ही निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार आहे.महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन पदवीधर मतदारसंघासाठी काम करावं यासाठी बैठक होती. महायुती म्हणून या निवडणुकीला आम्ही सामोरे जाणार आहोत. त्यामुळे निवडून येण्याच्या उद्देशाने सर्व कामाला लागले आहेत.

तो निर्णय सीएम, डीसीएम घेणार : कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेने उमेदवार दिला आहे. भाजपा देखील त्या जागेसाठी आग्रही असून आपण मनसेला मदत करणार की निवडणूक लढवणार या प्रश्नाला उत्तर देताना रवींद्र चव्हाण म्हणाले की, निवडणूक कोणी लढवावी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमचे सर्व वरिष्ठ नेते निर्णय घेतील. उमेदवार कोणी जरी असला तरी सर्वांनी एकत्रपणे महायुतीच्या उमेदवाराला जिंकण्यासाठी काम करावे. आजच्या बैठकीत कोकण पदवीधरसाठी कामाला लागा असे आदेश देण्यात आले. महायुतीचा उमेदवार निवडून येणार यासाठी काम करा असे आदेश देण्यात आले.

भाजपा आणि शिंदे गटाच्या वाट्याला कोणती जागा येणार? : विधान परिषद निवडणुका महायुतीच्या पातळीवर लढल्या जात आहे. स्वतंत्र पक्षाच्या स्तरावर लढणार का याबाबत आपल्याकडे माहिती नाही. महाविकास आघाडी आणि महायुती देखील पक्ष आपापले उमेदवार जाहीर करत आहे. या निवडणुका संदर्भात ना महाविकास आघाडीमध्ये चर्चा आहे न महायुतीत चर्चा आहे. त्यामुळे जे उभे राहात आहे ते राहात असल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटल आहे. शिवाजीराव नलावडे हे देखील विधानपरिषद निवडणुकसाठी इच्छुक आहेत. त्यांनी तयारी केली आहे तर लढा असं आम्ही त्यांना म्हटलं. विधान परिषदेच्या चार जागांवरून महायुतीत मनसे नंतर राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी जाहीर केलीय. त्यामुळे भाजपा आणि शिंदे शिवसेनेच्या वाट्याला दोनपैकी कोणती जागा येते हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा:

  1. मुख्यमंत्र्यांच्या कायदेशीर नोटीसला संजय राऊतांचं उत्तर, 'अब आयेगा मजा' - Eknath Shinde notice to Sanjay Raut
  2. नरेंद्र मोदी विजय होतील का? हिमालयात जाण्यापूर्वी रजनीकांतनं दिलं उत्तर, काय ते जाणून घ्या... - Rajinikanth
  3. पुणे हिट अँड रन प्रकरण: "आमदारकी कशी आणि कुठे वापरायची हे कळतं का?'...; अजित दादांनी 'त्या' आमदाराला झापलं... - Pune Hit And Run Case

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.