ETV Bharat / state

एसटी संपाचा फटका कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना; सरकारनं केली 'ही' सोय - ST Employees Strike - ST EMPLOYEES STRIKE

ST Employees Strike : गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्यामुळे कर्मचारी सातत्यानं आंदोलनाचं हत्यार उपसत असतात. ऐन सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्यांसाठी संप पुकारल्यामुळं कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची अडचण झालीय. गणेश उत्सव साजरा करण्यासाठी जादा गाड्यांची मागणी एसटीनं आता रेल्वेकडे केली आहे.

ST Employees Strike
एसटी कर्मचाऱ्यांच्या संप (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 3, 2024, 4:38 PM IST

Updated : Sep 3, 2024, 5:21 PM IST

मुंबई ST Employees Strike : ऐन सणासुदीच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी संपाचं हत्यार उपसलं. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनाही सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, अशी या कर्मचाऱ्यांची मागणी आहे. गणेशोत्सव तोंडावर असतानाच एसटी महामंडळाचे कर्मचारी संपावर गेल्यानं त्याचा फटका आता कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना बसलाय. गणपतीला गावी जाण्यासाठी कोकणी माणूस वाटेल ते करेल, असं म्हटलं जातं. त्यामुळं चाकरमानी सहा-सहा महिने आधीच रेल्वे आणि एसटीचं आरक्षण करतात. मात्र, आता गणेश उत्सव काळात एसटी कर्मचारी संपावर गेल्यानं कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होण्याची शक्यता आहे. कोकणातल्या लोकांची अडचण लक्षात घेत राज्य सरकारनं रेल्वेकडं मदत मागितली असून मध्य रेल्वेला जादा गाड्या सोडण्यास सांगितलंय.

गणेशोत्सव काळात ठाणे, मुंबई सेंट्रल, दादर येथून जादा एसटी बस सोडण्यात येतात. मिळालेल्या माहितीनुसार, 3 ते 7 सप्टेंबरपर्यंत 5,000 गणपती स्पेशल गाड्यांचं बुकिंग करण्यात आलं आहे. त्यामुळं या कर्मचाऱ्यांच्या संपाचा परिणाम गणपती विशेष गाड्यांवरही होणार आहे. या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांनी वेळेवर संप मागं न घेतल्यास खबरदारी म्हणून जादा गाड्या सोडण्याची मागणी राज्य सरकारनं मध्य रेल्वेकडे केली.

रेल्वेकडून सकारात्मक प्रतिसाद : राज्य सरकारच्या या मागणीला मध्य रेल्वेनंही सकारात्मक प्रतिसाद दिला असून, दिवा किंवा पनवेल स्थानकातून विशेष गाड्या सोडण्याची तयारी मध्य रेल्वेनं दर्शवली आहे. या संदर्भात मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी सांगितलं की, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं मध्य रेल्वेकडे मदत मागितली आहे. या संपाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेनं ज्यादा पाच गाड्या चालवण्याची तयारी ठेवली आहे. या गाड्या दिवा किंवा पनवेल स्थानकातून सुटतील. या दोन स्थानकांपैकी कोणत्या स्थानकावरून विशेष गाडी सोडायची याचा निर्णय त्या वेळेनुसार घेतला जाईल."

हेही वाचा

  1. हातानं टाळ्या नाही, वाजवितात ढोल ताशा; महाराष्ट्रातील पहिलं तृतीयपंथीयांचे पथक गणेशोत्सवाकरिता सज्ज - Transgenders Dhol Tasha Pathak

Last Updated : Sep 3, 2024, 5:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.