ETV Bharat / state

साताऱ्यातील कास, कांदाटी अन् कोयना खोरं बहरलं व्हायटी फुलांनी, आठ वर्षांतून एकदा येतात फुलं - WESTERN GHATS

व्हायटी वनस्पतीला आठ वर्षांतून एकदाच ही फुले येतात. त्यामुळं वनस्पती अभ्यासक आणि मधमाशी पालनासाठी मोठी पर्वणी ठरली आहे.

white flowers
व्हायटी वनस्पती (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 7, 2024, 2:16 PM IST

सातारा : कास, कांदाटी आणि कोयना खोऱ्यात पांढऱ्या शुभ्र व्हायटी फुलांना बहर आलाय. पर्यटक, संशोधक आणि अभ्यासकांसाठी ही पर्वणी ठरलीय. जागतिक वारसास्थळाचं कोंदण लाभलेल्या कास पठारासह कांदाटी, कोयना खोऱ्यात सध्या व्हायटी फुलांचा आविष्कार पाहायला मिळतोय. व्हायटी वनस्पतीला आठ वर्षांतून एकदाच ही फुले येतात. त्यामुळं वनस्पती अभ्यासक आणि मधमाशी पालनासाठी मोठी पर्वणी ठरली आहे.

पश्चिम घाटात आढळणारी वनस्पती : व्हायटी वनस्पती ही पश्चिम घाटातील सह्याद्रीच्या खोऱ्यात आढळून येणारी झुडुप वर्गातील वनस्पती आहे. या वनस्पतीचं शास्त्रीय नाव (Thelepaepale ixiocephala, Family-Acanthaceae ) आहे. या वनस्पतीची उंची 5 फूट असते. आठ वर्षांतून एकदा या वनस्पतीला फुलं येत असून, ती पांढरी शुभ्र असतात. फुलोरी, सातेरी, आग्या, मेलिफेरा, ट्रायगोना अशा सर्व प्रकारच्या मधमाशा व्हायटी फुलांमधून मध आणि परागकण गोळा करतात.

नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात येतो फुलोरा : व्हायटी वनस्पतीला नोव्हेंबर ते डिसेंबरदरम्यान फुलोरा येतो. परंतु सह्याद्री घाटमाथा परिसरात हा फुलोरा जानेवारीपर्यंत टिकणार असल्याचं वनस्पती अभ्यासकांचं म्हणणं आहे. कास परिसरातील अंधारी, फळणी, उंबरी, घाटाई मंदिर, मुनावळे, कास, कोयना खोऱ्यातील रेणोशी, खरोशी, रुळे, शिरनार, दाभेमोहन, कोट्रोशी आणि कांदाटी खोऱ्यातील गावढोशी, वाळणे, आवळण, आरव, निवळी, आकल्पे, दरे तांब, पिंपरी, लामज, उचाट, वाघावळे, वलवण, पर्वत, सालोशी ही गावं सध्या व्हायटी फुलांनी बहरलीत.

व्हायटी मधाची 'ही' आहेत वैशिष्ट्ये : व्हायटी मधाचा रंग पांढरा, पिवळसर असतो. व्हायटी मधातील ग्लुकोजमुळं थंडीत मधाचे कणीभवन 20 ते 30 दिवसांत होते. पांढरा, पिवळसर मध टोस्ट, ब्रेड तसेच चपातीबरोबर खाल्ला जातो. हा मध बहुगुणी औषधी असून, या मधाला मोठी मागणी असते. हा मध बलवर्धक असल्यानं अशक्तपणा दूर करण्यासाठी तसेच स्नायूंना बळकटी आणण्यासाठी वापरतात.

मध संचालनालयाचं आवाहन : महाबळेश्वर येथील मध संचालनालयाचे माजी संचालक दिग्विजय पाटलांनी मधपाल आणि विद्यार्थ्यांना आवाहन केलंय की, मध संचालनालयाकडून मेणपत्रा खरेदी करावा. मधुकोटी फ्रेम्सला लावून मधाची पोळी ओढून घ्यावीत. जुनी खराब झालेली मधुपोळी गाळून घेऊन त्याचे मेण तयार करावे. रिकाम्या फ्रेम्सना मेणपत्रा लावून नवीन पोळी तयार करावी. कमी मधमाश्या असणाऱ्या कमजोर मध वसाहती मजबूत कराव्यात. तसंच वनस्पतीशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी व्हायटी मधाच्या परागाचे संकलन आणि पराग पृथःकरण करावं, असंही मध संचालनालयानं म्हटलंय.

हेही वाचा :

  1. विधानसभा अध्यक्षपद नको, तर कॅबिनेट मंत्रिपदासाठी नेत्यांची लॉबिंग
  2. अजित पवार यांना मोठा दिलासा : बेनामी संपत्ती जप्त प्रकरणात क्लीन चिट
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.