ETV Bharat / state

सेक्स स्कँडलनंतर प्रज्वल रेवन्ना पहिल्यांदाच आला समोर; व्हिडिओ पोस्ट करत म्हणाला, "31 मे रोजी सकाळी...." - Prajwal Revanna Video

Prajwal Revanna Video : कर्नाटकातील हसन लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रज्वल रेवन्ना याच्यावर महिलांच्या लैंगिक छळाचा (Karnataka Sex Scandal) आरोप करण्यात आला. त्याच्याविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली. आता प्रज्वल रेवन्ना यानं व्हिडिओ संदेश जारी करून माहिती दिली आहे की, 31 मे रोजी सकाळी 10 वाजता एसआयटीसमोर हजर होणार आहे.

Etv Bharat
प्रज्वल रेवन्ना (ETV Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 27, 2024, 7:45 PM IST

बंगळुरू(कर्नाटक) Prajwal Revanna Video : हसनचे खासदार प्रज्वल रेवन्ना याच्यावर लैंगिक छळाचा (Karnataka Sex Scandal) आरोप आहे. 31 मे रोजी खटल्यांची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकासमोर हजर राहणार असल्याचं प्रज्वल रेवन्ना यानं सांगितलं आहे. प्रज्वलनं कन्नड टीव्ही चॅनलवर प्रसारित केलेल्या व्हिडिओ स्टेटमेंटमध्ये ही माहिती दिली.

न्यायालयावर विश्वास : प्रज्वल रेवन्ना व्हिडिओमध्ये म्हणाला, "मी शुक्रवार, 31 मे रोजी सकाळी 10 वाजता एसआयटीसमोर वैयक्तिकरित्या हजर राहीन आणि तपासात सहकार्य करुन आरोपांना उत्तर देईन. माझा न्यायालयावर विश्वास असून, खोट्या खटल्यांतून मी न्यायालयाच्या माध्यमातून बाहेर पडेन, असा विश्वास आहे." तो पुढं म्हणाला, "देव, लोक आणि कुटुंबाचा आशीर्वाद माझ्यावर असो. मी शुक्रवार, 31 मे रोजी निश्चितपणे एसआयटीसमोर हजर होईन. परत आल्यानंतर हे सर्व संपवण्याचा प्रयत्न करेन. माझ्यावर विश्वास ठेवा."

'ब्लू कॉर्नर नोटीस' जारी : 'सीबीआय'मार्फत 'एसआयटी'नं केलेल्या विनंतीनंतर, इंटरपोलनं प्रज्वल रेवन्नाच्या ठावठिकाणाविषयी माहिती मागणारी 'ब्लू कॉर्नर नोटीस' आधीच जारी केली आहे. 'एसआयटी'नं दाखल केलेल्या अर्जानंतर विशेष न्यायालयानं 18 मे रोजी प्रज्वल रेवन्ना विरुद्ध अटक वॉरंट जारी केलं. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील कर्नाटक सरकारनं त्याचा डिप्लोमॅटिक पासपोर्ट रद्द करण्याची विनंती केंद्राकडं केली.

प्रज्वल रेवन्ना विदेशात : कर्नाटकमधील मतदानानंतर प्रज्वल रेवन्ना सेक्स स्कॅण्डल प्रकरण उघड झालं. प्रज्वल रेवन्नाच्या चालकानंच व्हिडिओ क्लिप असणारा पेनड्राईव्ह पोलिसांना दिला. त्यानंतर पोलिसांनी प्रज्वल रेवन्नाचा शोध सुरू केला. मात्र, तोपर्यंत तो विदेशात फरार झाला होता. त्याच्याविरोधात लुकआऊट नोटिसाही काढण्यात आल्या. फरार झाल्यापासून त्याच्याकडून या संपूर्ण प्रकरणावर कोणतंही भाष्य करण्यात आलं नव्हतं. अखेर त्यानं एका व्हिडिओच्या माध्यमातून भूमिका मांडली.

दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झालेला असून, त्याची खात्री 'ईटीव्ही भारत' करत नाही.

हेही वाचा -

  1. सेक्स स्कँडल प्रकरणात एचडी रेवन्नाला एसआयटीनं घेतलं ताब्यात, प्रज्वलविरोधात इंटरपोलकडून ब्लू कॉर्नर नोटीस - Prajwal Revanna sex scandal
  2. कथित सेक्स टेप प्रकरणी प्रज्वल रेवन्नाविरोधात ग्लोबल लुकआउट नोटीस, अटकेची टांगती तलवार कायम - Prajwal Revanna Lookout Notice
  3. कथित अश्लील व्हिडिओ प्रकरणात खासदार प्रज्वल रेवन्ना अडचणीत एसआयटी स्थापण्याचे मुख्यमंत्री सिद्धरामैय्यांचे आदेश - Prajwal Revanna obscene video case

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.