ETV Bharat / state

महिला विकासाच्या नुसत्या गप्पाच; मुंबईतून एकाही महिलेला लोकसभेचं तिकीट नाही - lok sabha election 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 15, 2024, 9:04 PM IST

Updated : Apr 15, 2024, 9:40 PM IST

Lok Sabha Election 2024 : NDA असो की, इंडिया आघाडी या दोघांनीही लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू केला आहे. त्यांनी महिलांच्या विकासासाठी विविध आश्वासनंही दिली. परंतु, यापैकी कुणीही मुंबईतून महिलांना लोकसभेची उमेदवारी दिलेली नाही.

Women Candidacy Issue
महिलांना उमेदवारी

मुंबई Lok Sabha Election 2024 : NDA असो की, इंडिया आघाडी दोन्ही बाजूंचा प्रचार जोरात सुरू आहे. दोन्ही बाजूच्या प्रमुख पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला असून त्याला भाजपाने 'मोदी की गॅरंटी' म्हटलं आहे, तर काँग्रेसने 'न्याय पत्र' म्हटलं आहे. या दोन्ही पक्षांच्या जाहीरनाम्यात एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे, महिला सशक्तीकरणाची. भाजपाने त्याला 'नारी सन्मान' असं नाव दिलं आहे. तर काँग्रेसने त्याला 'नारी न्याय' असं नाव दिलं आहे. दोन्ही पक्षांनी महिलांच्या सशक्तीकरणासाठी आणि प्रगतीसाठी आपल्या जाहीरनाम्यात आश्वासन दिली असली तरी, प्रत्यक्षात मात्र त्यातलं काहीही होताना दिसत नाही. हे सांगायचं कारण म्हणजे, आता मतदानाचा दिवस हळूहळू जवळ येतोय. मात्र, अद्यापही देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघात कोणत्याही पक्षांकडून महिला उमेदवार देण्यात आलेले नाहीत.

ही तर महिलांची हेटाळणीच : असं म्हणतात मुंबई देशाला दिशा देते. मुंबईत जे काही घडतं त्याचे परिणाम संपूर्ण देशावर होतात. मात्र, अशा मुंबईत प्रमुख राजकीय पक्षांना एकही महिला उमेदवार मिळत नाही ही शोकांतिका म्हणावी लागेल. या देशाने मृणाल गोरेंसारख्या नेत्या पाहिल्या. त्यांनी सामान्य जनतेच्या पाणी हक्कासाठी चळवळ उभारली, लढा उभारला. संपूर्ण देशाने त्यांचे नेतृत्व पाहिलं. जयवंतीबेन मेहता, प्रिया दत्त यांच्यासारख्या नेत्या यापूर्वी मुंबईने लोकसभेत पाठवल्या आहेत. अशा मुंबईत आज केवळ भाजपाच्या पूनम महाजन या एकच महिला खासदार उरल्या आहेत. सध्या पूनम महाजन यांचे देखील तिकीट कापले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मुंबई लोकसभा निवडणुकीच्या मैदानातून महिला हद्दपार होतात की काय? असा प्रश्न उभा राहतो.

'या' जागांवर उमेदवार जाहीर : मुंबईच्या सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीकडून उत्तर मुंबईमध्ये पियुष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उत्तर-पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे विहीर कोटेजा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाच्या राहुल शेवाळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, महाविकास आघाडी कडून मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाने अमोल कीर्तिकर, उत्तर-पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून संजय दिना पाटील, दक्षिण मध्य मुंबई ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई, दक्षिण मुंबई मधून ठाकरे गटाने अरविंद सावंत यांना उमेदवारी दिली आहे.

पेच असलेल्या जागा : मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी कडून अद्यापही उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून अद्याप उमेदवार देण्यात आलेली नाही. मुंबई उत्तर-मध्य असा मतदारसंघ आहे जिथे महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांनी उमेदवार जाहीर केलेला नाही. दक्षिण मुंबईतून महायुतीकडून अद्याप उमेदवार देण्यात आलेला नाही.

तीन महिला, तिकीट कुणाला? : मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड इच्छुक होत्या. मात्र, ही जागा ठाकरे गटाच्या वाट्याला गेल्याने तिथे अनिल देसाई यांना उमेदवारी दिली आहे. तर, उत्तर मुंबईतून शिवसेना ठाकरे गटाचे दिवंगत नेते अभिजीत घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्विनी घोसाळकर यांचे नाव चर्चेत आहे. मात्र, ही जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्याने त्यांनी काँग्रेसच्या चिन्हावर लढावं अशी अट काँग्रेस कडून त्यांना देण्यात आल्याचं समजतं. त्यामुळे या जागेवरून तिढा कायम आहे. उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून सध्या पुनम महाजन या सीटिंग खासदार आहेत. मात्र, त्यांना तिकीट मिळणार की नाही हे अद्याप गुलदस्त्यात आहे. या जागेवरून भाजपाचे आशिष शेलार यांचे नाव चर्चेत आहे.

उत्तर-मध्य मतदारसंघाची परंपरा मोडीत? : मुंबईच्या सहा लोकसभा मतदारसंघांपैकी उत्तर-मध्य मुंबई हा लोकसभा मतदारसंघ विशेष आहे. या लोकसभा मतदारसंघातून महिला लोकप्रतिनिधी संसदेत जाण्याची परंपरा आहे. मात्र, ही परंपरा या निवडणुकीत मोडली जाते की काय असं चित्र आहे. 2009 मध्ये या लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रिया दत्त यांनी विजय मिळवला होता. तर, 2014 आणि 2019 या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाच्या पूनम महाजन यांनी विजय मिळवला. 2014 आणि 2019 या दोन वेळेला या मतदारसंघात प्रिया दत्त आणि पुनम महाजन या दोघांमध्ये मुख्य लढत झाल्याचं पाहायला मिळतं.

आकडेवारी काय सांगते? : 2009 ते 2019 या तीन लोकसभा निवडणुकांमध्ये मुंबईच्या सहा लोकसभा मतदारसंघातून किती महिला उभ्या राहिल्या आणि त्यांना किती मतं मिळाली हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. याची आकडेवारी मिळवण्यासाठी आम्ही निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळाला भेट दिली. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार 2009 मध्ये उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून प्रिया दत्त यांना 3 लाख 19 हजार मतं मिळाली होती. तर, उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून मनसेच्या शिल्पा सरपोतदार यांना 1 लाख 32 हजार मतं मिळाली होती. उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून मनसेच्या शालिनी ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात होत्या. त्यांना 1 लाख 24 हजार मतं मिळाली होती.

2014 लोकसभा आकडेवारी : 2014 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपाकडून पुनम महाजन रिंगणात होत्या. त्यांना 4 लाख 78 हजार मतं मिळाली होती. तर, पूनम महाजन यांच्या विरोधात काँग्रेसच्या प्रिया दत्त यांनी निवडणूक लढवली होती. त्यांना 2 लाख 71 हजार मतं मिळाली. ईशान्य मुंबई मधून आम आदमी पक्षाच्या मेधा पाटकर यांनी निवडणूक लढवली होती. त्यांना 71 हजार मतं मिळाली होती. याच लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या निहारिका खोंडले यांना 68 हजार तर, मनसेच्या श्वेता पालकर यांना 1 लाख 8 हजार इतकी मतं मिळाली होती.

2019 लोकसभा आकडेवारी : 2019 च्या लोकसभा निवडणुकीत तीनच महिला निवडणुकीच्या रिंगणात होत्या. उत्तर-मध्य मुंबईतून भाजपाच्या पूनम महाजन यांना 4 लाख 86 हजार मतं मिळाली होती. याच मतदारसंघात पूनम महाजनांच्या विरोधात काँग्रेसने प्रिया दत्त यांना उमेदवारी दिली होती. त्यांना 3 लाख 56 हजार इतकी मतं मिळाली होती. तर, उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी दिली होती. त्यांना दोन लाख 41 हजार मतं मिळाली.

विद्या चव्हाण यांचे मत : या संदर्भात आम्ही राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या आणि माजी आमदार विद्या चव्हाण यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी सांगितलं की, "उमेदवारी कोणाला द्यायची याबाबत प्रत्येक पक्षाचे काही निकष ठरलेले असतात. त्यानुसारच उमेदवारी जाहीर केली जाते. वर्षा गायकवाड यांना यावेळी लोकसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी होती. मात्र, शिवसेनेने दादागिरी करत आपले उमेदवार जाहीर केले आणि त्यांची संधी हुकली. आता तेजस्विनी घोसाळकर यांचे नाव चर्चेत आहे. मात्र, ती सीट काँग्रेसच्या वाट्याला आहे. त्यामुळे शिवसेनेने दक्षिण-मध्य मुंबई वर्षा गायकवाड यांना सोडून उत्तर मुंबई तेजस्विनी घोसाळकर यांना द्यावी. उमेदवारी देताना राजकीय पक्षांचे निकष लावतात या निकषांमध्ये कदाचित मुंबईच्या महिला नेत्या बसत नसतील. त्या निवडून येतील असं पक्षश्रेष्ठींना वाटत नसावं," अशी प्रतिक्रिया विद्या चव्हाण यांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. महाराष्ट्रात गोळीबारांच्या घटनांमध्ये मोठी वाढ; का होतायेत गोळीबार? कोण जबाबदार? - Firing Cases In Maharashtra
  2. "अमित शाहांच्या पुत्रप्रेमामुळंच भारत विश्वचषक हरला"; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल - uddhav thackeray on amit shah
  3. "अभी तो ट्रेलर है"म्हणत पंतप्रधान मोदींचा विरोधकांना इशारा; 'ईडी'चं केलं कौतुक - PM Narendra Modi on ED

Last Updated : Apr 15, 2024, 9:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.