ETV Bharat / state

पत्रकार हर्षल भदाणे यांचा ट्रकच्या धडकेत मृत्यू, चालकाला अटक - Journalist Harshal Bhadane - JOURNALIST HARSHAL BHADANE

Journalist Harshal Bhadane पत्रकार हर्षल भदाणे यांचा धुळ्यातील अपघातात मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास झाला. हर्षल भदाणे हे मुंबईतील एक माध्यम समूहात कार्यरत होते.

Journalist Harshal Bhadane
पत्रकार हर्षल भदाणे (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 30, 2024, 10:50 AM IST

Updated : Jul 30, 2024, 2:23 PM IST

धुळे Journalist Harshal Bhadane: भरधाव ट्रकनं धडक दिल्यामुळे पत्रकार हर्षल भदाणे यांचा जागीच मृत्यू झाला. २९ जुलै रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास धुळे जिल्ह्यातील गरताडबारी जवळ हा अपघात झाला. ट्रकनं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला जोरदार धडक दिली. त्यामुळे हर्षल यांनी घाबरुन बाहेर उडी मारली. ते ट्रकच्या चाकात चिरडले गेले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघं जण गंभीर जखमी झाले आहेत.

"एका ट्रकनं कारला धडक देत तीन व्यक्तींना उडवल्याची माहिती मिळाली. यात एका पत्रकाराचा मृत्यू झाला आहे. याच ट्रकनं चाळीसगाव क्रॉस येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील आणखी दोन वाहनांना उडवलं. ट्रकचालक आणि क्लिनर यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तसंच ट्रक मोहाळी पोलीस स्टेशन इथं रवाना करण्यात आला." - धीरज महाजन, पोलीस निरीक्षक

नेमका कसा घडला अपघात? : अपघातात मृत्यू झालेले पत्रकार हर्षल भदाणे मुंबईतील एका माध्यम समूहात कार्यरत होते. ते धुळे जिल्ह्यातील बोरकुंड येथील रहिवासी आहेत. सायंकाळी बोरकुंड गावी परत जात असताना रस्त्याच्या कडेला त्यांची गाडी उभी होती. त्यावेळी भरधाव ट्रकनं त्यांच्या वाहनाला धडक दिली. स्वःचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी वाहनातून उडी मारली. मात्र, सुसाट वेगानं आलेल्या ट्रकच्या चाकाखाली येऊन ते चिरडल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पत्रकार हर्षल भदाणे यांचा ट्रकच्या धडकेत मृत्यू (ETV Bharat Reporter)

नागरिकांनी केली ट्रकवर दगडफेक : या घटनेनंतर ट्रक चालकानं शहरातील दोन वाहनांनादेखील धडक दिली. यावेळी परिसरातील नागरिकांनी ट्रकवर दगडफेक केली. यानंतर ट्रकचालक पसार होण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. ट्रकचालक आणि क्लिनर पोलिसांच्या ताब्यात आहेत. घटनास्थळी असलेल्या काही नागरिकांच्या म्हणण्यानुसार ट्रकचालक हा मद्यधुंद अवस्थेत होता. परंतु याबाबत अद्याप पोलिसांकडून अधिकृत माहिती मिळाली नाही.

काळानं घातला घाला : पत्रकारितेच्या क्षेत्रात अल्पावधीतच आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे हर्षल भदाणे यांचं अकाली जाणं संपूर्ण पत्रकारितेसाठी मोठी हानी आहे. हर्षल हे केवळ एक पत्रकार नव्हते, तर एक संवेदनशील आणि कणखर व्यक्तिमत्व होते. त्यांच्या पत्रकारितेतून समाजातील विविध पैलूंवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या अचानक जाण्यानं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि आई-वडील आहेत.

हेही वाचा

  1. जळगावमध्ये भरधाव कारनं 5 महिला 2 चिमुकल्यांना उडवलं, एक ठार; जमावाकडून कार चालकाला बेदम मारहाण - Jalgaon Accident
  2. भरधाव कार आणि ट्रकची जोरदार धडक; एकाच कुटुंबातील सहा जण ठार - Road Accident In Bikaner

Last Updated : Jul 30, 2024, 2:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.