ETV Bharat / state

"शिवाजी महाराजांनी उभारलेले किल्ले भक्कमपणे उभे, पण..." महाविकास आघाडीचा महायुतीवर निशाणा - statue of chhatrapati shivaji

MVA Leaders Criticized Mahayuti : नौदल दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची घटना आज (26 ऑगस्ट) दुपारी घडली. यावरुन आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुतीवर निशाणा साधलाय.

MVA leaders criticized Mahayuti over statue of chhatrapati shivaji maharaj collapsed at rajkot fort in sindhudurg
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन 'मविआ'च्या नेत्यांनी महायुतीला घेरलं (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 26, 2024, 9:57 PM IST

मुंबई MVA Leaders Criticized Mahayuti : मालवणमधील सिंधुदुर्ग राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ्याची घटना आज (26 ऑगस्ट) दुपारी घडल्यानंतर राज्यभरातील शिवप्रेमी संतप्त झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 4 डिसेंबर 2023 रोजी पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं. तर आज घडलेल्या घटनेनंतर शिवरायांच्या पुतळ्याचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप शिवप्रेमी आणि विरोधी पक्षातील नेते करत आहेत.

जयंत पाटील आणि विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter)

महाराजांच्या सन्मानाशी काही घेणं देणं नाही : "राजकोट किनारी उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची बातमी अतिशय धक्कादायक आहे. यामुळं राज्यातील तमाम शिवप्रेमी दुखावले आहेत," अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलीय. पुतळा निर्माण करताना गुणवत्ता आणि दर्जाची काळजी घ्यायला हवी होती. सरकारला दर्जाशी काही घेणं देणं नाही. कमिशन घेणं आणि कंत्राट वाटणं एवढंच काम निष्ठेनं सुरू असल्याचंही ते म्हणाले.

महाराजांचा पुतळा उभारतांना काळजी घेण्यात आली नाही. फक्त पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण करायचं हेच सत्ताधाऱ्यांचं लक्ष होतं. महाराजांचं नाव वापरायचं, त्यांचे आचार-विचार आणि सन्मानाविषयी यांना काही घेणं-देणं नाही-प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष,जयंत पाटील

कंत्राटदारावर गुन्हा दाखल करा : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील सरकारला खडेबोल सुनावले आहेत. "शिवाजी महाराजांनी उभारलेले किल्ले भक्कमपणे उभे आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते अनावरण झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नेस्तनाबूत झालाय. महाराजांचा पुतळ्या उभारण्यातदेखील भ्रष्टाचार झाला आहे," असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय. "सदर ठिकाणी पुन्हा एकदा महाराजाचा पुतळा दिमाखात उभारण्यात यावा," अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे. "राज्यातील सरकार शिवाजी महाराजांच्या विचाराचे नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. पुतळा उभारणार्‍या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी," अशी मागणी देखील वडेट्टीवार यांनी केली आहे.

बिनधास्त सुटू, असा अहंकार : शिवसेना (ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनीदेखील या घटनेवरुन तीव्र संताप व्यक्त करत महाराजांच्या प्रतिमेचा केवळ वापर करणाऱ्या भाजपासारख्या विषारी सापाला आता चेचावा लागेल, अशा शब्दात हल्ला चढवलाय. "महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही," असा सूचक इशाराही त्यांनी सरकारला दिलाय. यासंदर्भात एक्सवरून पोस्ट करत ते म्हणाले की, "निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून घाईघाईत बनवलेले आणि मोदीजींच्या हस्ते उद्धाटन झालेले छत्रपती शिवरायांचे मालवण येथील स्मारक आज केवळ 8 महिन्यातच कोसळले. महायुती सरकारची कंत्राटदार धार्जिणी राजवटबरोबरच भाजपाची त्याहूनही घातक मानसिकता याला कारणीभूत आहे. आम्ही काहीही करू आणि त्यातून बिनधास्त सुटू, असा अहंकार भाजपामध्ये आहे. त्याच अहंकारापोटी महाराजांच्या स्मारकाचं गांभीर्य लक्षात न घेता ते घाईत बनवण्यात आले."

पुतळा कोसळण्याचं मुख्यमंत्र्यांनी 'हे' सांगितलं कारण-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीत माध्यमांशी बोलताना शिवरायांचा पुतळा कोसळण्याची घटना दुर्दैवी असल्याचं सांगितले. "आमच्यावर टीका करण्यासाठी विरोधी पक्षांकडे भरपूर वेळ आहे. मी त्यावर जाणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहेत. नौदलानं शिवरायांचा पुतळा डिझाइन करून बांधला होता. वारा 45 किमी प्रतितास वेगाने येत असल्यानं पुतळा खराब झाल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. नौदलाचे अधिकारी आणि रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण घटनास्थळी पोहोचणार आहे आहेत. आम्ही पुतळा पुन्हा त्वरित बांधणार आहोत."

टेंडरबाज सरकारला जमीनदोस्त करा : राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीदेखील सरकारवर निशाणा साधलाय. "मालवण येथील महाराजांच्या पुतळ्या संदर्भात झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. बेजबाबदार सरकारचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो. सरकार फक्त दिखाव्यासाठी काम करतंय का? महापुरुषांच्या स्मारकाच्या कामात देखील दलाली खाल्ली का?" असा संतप्त सवाल त्यांनी सत्ताधाऱ्यांना केलाय. तसंच दलालीत अडकलेल्या टेंडरबाज सरकारला जमीनदोस्त केल्याशिवाय महाराष्ट्र शांत बसणार नाही. प्रत्येक गोष्टीत डराव-डराव करणारे नेते सरकारला जाब विचारतील अशी अपेक्षा व्यक्त करतो," असंही ते म्हणाले.

हेही वाचा -

  1. पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण झालेला शिवरायांचा पुतळा कोसळला, इंद्रजीत सावंत यांनी केला 'हा' गंभीर आरोप - statue of chhatrapati shivaji

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.