जळगाव Jalgaon Lok Sabha Election Results 2024 : जळगाव लोकसभा मतदारसंघ (Jalgaon lok Sabha) हा भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. यावेळी या मतदारसंघातून स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. तर महाविकास आघाडीच्या वतीनं ठाकरे गटातील करण पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून स्मिता वाघ आघाडीवर असल्याचं बघायला मिळालं. त्यामुळं स्मिता वाघ यांनी २ लाख ४० हजार मतांची निर्णायक आघाडी घेतली असून संपूर्ण मतमोजणीनंतर त्यांच्या विजयाची औपचारिक घोषणा होईल.
जळगाव मतदारसंघाचा इतिहास : जळगाव मतदारसंघाचा दोन दशकांचा इतिहास पाहता, 1999 पासून प्रत्येक लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात अपवाद वगळता भाजपाचा विजय झाला आहे. 2004 मध्ये भाजपा खासदार अण्णासाहेब पाटील लाच प्रकरणात अडकल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे काँग्रेसचे ॲड. वसंतराव मोरे विजयी झाले होते. जळगाव लोकसभा मतदारसंघाचं नाव पूर्वी एरंडोल मतदारसंघ असं होतं. एरंडोल लोकसभा मतदारसंघात एरंडोल, पारोळा, पाचोरा, चाळीसगाव, अमळनेर, चोपडा असं सहा विधानसभा मतदारसंघ होते. 2009 मध्ये मतदारसंघांची पुनर्रचना होऊन मतदारसंघांत काही बदल झाले. या बदलाचे परिणाम अनेकांच्या राजकीय कारकिर्दीवर झालाय. 2009 च्या म्हणजे 15 व्या लोकसभेच्या निवडणुकीवेळी पुनर्रचित मतदारसंघांच्या रचनेनुसार निवडणुका झाल्या. पुनर्रचनेनंतर एरंडोल लोकसभा मतदारसंघाचं नाव जळगाव लोकसभा मतदारसंघ, असं झालं. या मतदारसंघात जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, अमळनेर, पारोळा-एरंडोल, चाळीसगाव, पाचोरा-भडगाव या विधानसभा मतदारसंघांचा समावेश झाला. या मतदारसंघातील पूर्वाच्या पारोळा-भडगाव मतदारसंघातील भडगाव तालुका हा पाचोरा तालुक्याला जोडला गेला, तर या तालुक्यातील आमडदे-गिरड जिल्हा परिषद गट हा एरंडोल विधानसभा मतदारसंघात समाविष्ट झाला.
भाजपानं 2009 पासून पुन्हा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेतला. 2019 मध्ये विद्यमान खासदार ए. टी. पाटील यांना उमेदवारी न देता स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली होती. परंतु, नंतर त्यांची उमेदवारी रद्द करुन चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांना ऐनवेळी उमेदवारी देण्यात आली. त्यांच्याविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे गुलाबराव देवकर रिंगणात होते. त्यावेळी मंत्री गिरीश महाजन यांचे पाटील हे निकटवर्तीय होते. तेव्हापासून आतापर्यंत हा मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला राहिलाय. तर यंदा निवडणुकीत भाजपानं आपला गड राखल्याचं बघायला मिळतंय.
जळगाव लोकसभा मतदारसंघातील मागील काही निवडणुकांचे निकाल :
वर्ष- 2019: उन्मेष भैयासाहेब पाटील (विजयी उमेदवार- भाजापा) 65.6% मतं
वर्ष- 2014: नाना पाटील (विजयी उमेदवार- भाजपा) 65.63% मतं
वर्ष- 2009: नाना पाटील (विजयी उमेदवार- शिवसेना) 52.34% मतं
वर्ष- 2004 : वाय. जी. महाजन (विजयी उमेदवार- भाजपा) 48.44% मतं
वर्ष- 1999 : वाय. जी. महाजन (विजयी उमेदवार- भाजपा) 47.44% मतं
वर्ष- 1998 : उल्हास वासुदेव पाटील (विजयी उमेदवार- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) 54.4% मतं
हेही वाचा -
- मशाल पेटली! भाऊसाहेब वाघचौरेंना साईबाबा पावले; शिर्डीतून सदाशिव लोखंडेंचा पराभव - Shirdi Lok Sabha Results 2024
- शिंदेंच्या ठाण्यात कोण बाजी मारणार? नरेश म्हस्के आघाडीवर, तर राजन विचारे पिछाडीवर - Thane Lok Sabha Results 2024
- जळगावमधून भाजपाच्या स्मिता वाघ विजयी, नगरमधून निलेश लंके आघाडीवर - Maharashtra lok Sabha election