ETV Bharat / state

घाणेरड्या राजकारणापासून महाराष्ट्राला वाचवणं गरजेचं - राज ठाकरे - RAJ THACKERAY

राज ठाकरे यांनी मनसे सह सर्वच पक्षातील घाणेरड्या राजकारणावर केली सडकून टीका. कोणत्याही पक्षापेक्षा महाराष्ट महत्वाचा असल्याचं केलं वक्तव्य...

राज ठाकरे
राज ठाकरे (ईटीव्ही भारत बातमीदार)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 4, 2024, 9:01 PM IST

ठाणे : शिवसेना असू देत, राष्ट्रवादी असू दे, भाजपा असू दे, मनसे असू दे की कोणताही राजकीय पक्ष. या सगळ्यांपेक्षा महाराष्ट्र मोठा असून कोणताही पक्ष टिकला नाही टिकला हे महत्त्वाचं नाही. महाराष्ट्र टिकला पाहिजे, आताच्या या घाणेरड्या राजकारणापासून महाराष्ट्राला वाचवणं गरजेचं आहे, असं सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर आसूड ओढले. डोंबिवलीच्या पी अँड टी कॉलनी येथे मनसेचे कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार राजू पाटील यांच्या प्रचारासाठी झालेल्या जाहीर सभेमध्ये ते बोलत होते.

एका मुख्यमंत्र्यांच्या राजकीय कार्यक्रमाच्या स्टेजवर लोकांची करमणूक म्हणून एका भोजपुरी महिलेनं नृत्य केल्याच्या प्रकाराबद्दल राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. ज्या महाराष्ट्राने अटकेपार झेंडे रोवले, ज्या महाराष्ट्राकडे एक सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणून पाहिलं जायचं त्याच महाराष्ट्रात काही गोष्टी होतात. या गोष्टी तर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये होत असल्याचं सांगत हीच का लाडकी बहीण योजना असा संतप्त सवाल उपस्थित करत एकनाथ शिंदे यांनी या प्रकराकडे वैयक्तिक लक्ष घालण्याची सूचना केली. तसंच आपण आज केवळ आपल्याशी संवाद साधायला आलो असून पुन्हा 15 नोव्हेंबरला याच ठिकाणी येणार असल्याचं सांगितलं.

राज ठाकरे आणि मनसेचे उमेदवार
राज ठाकरे आणि मनसेचे उमेदवार (ईटीव्ही भारत बातमीदार)

कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार आणि उमेदवार राजू पाटील यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर तुफान हल्ला चढवला. तसंच लोकसभा निवडणुकीला आपण केवळ राज ठाकरे यांनी आपल्याला सांगितल्यामुळेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना मदत केली असा गौप्यस्फोट केला. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, डोंबिवली शहरध्यक्ष राहुल कामत, कल्याण पश्चिमचे उमेदवार उल्हास भोईर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

हेही वाचा...

  1. राज ठाकरेंची हिंदुत्वासाठी व्यापक भूमिका; देवेंद्र फडणवीसांनी सांगितला सत्तेचा 'राज'मार्ग
  2. राज्यात कुठल्या बंडखोरांनी मागे घेतले अर्ज? तर, कोण निवडणूक लढवण्यावर ठाम? वाचा सविस्तर
  3. पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघाचं चित्र स्पष्ट; महायुती महाविकास आघाडीत होणार समोरासमोर लढत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.