ETV Bharat / state

इस्त्राईलच्या रस्ते सुरक्षा मंत्री मिरी रेगेव्ह यांनी  कोस्टल रोडची पाहणी; कामगारांचं केलं कौतुक - मिरी रेगेव

Israeli Minister Miri Regev Visits Coastal Road : इस्त्राईलच्या रस्ते सुरक्षा मंत्री मिरी रेगेव्ह यांनी मुंबईच्या कोस्टल रोडची पाहणी केली. यानंतर त्यांनी तेथील कामागारांसोबत फोटोही काढले. तसंच त्यांचं कौतुकही केलं.

Miri Regev Visits Coastal Road
Miri Regev Visits Coastal Road
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 12, 2024, 10:33 PM IST

मुंबई Israeli Minister Miri Regev Visits Coastal Road : मुंबई कोस्टल रोड प्रकल्पामुळं मुंबईचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होईल, असा दावा मुंबई महापालिकेनं केलाय. देशाची आर्थिक राजधानी असलेलं मुंबई शहर ही एक मोठी बाजारपेठ आहे. इथं तुम्हाला देशाच्या नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यातून खरेदीदार या बाजारपेठेत आलेले दिसतील. या बाजारपेठांमधील असुविधांचा फटका विक्रेत्यांसोबतच नागरिकांनाही बसतो. यात वाहतूक कोंडी हा मुख्य अडथळा ठरतो. याच वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून पालिकेनं कोस्टल रोड प्रकल्प हाती घेतला. या प्रकल्पाचा पाहिला टप्पा आता पूर्ण झाला. या प्रकल्पाची इस्त्राईलच्या रस्ते सुरक्षा मंत्री मिरी रेगेव्ह यांनी पाहणी केलीय.

काय म्हणालं महापालिका प्रशासन : यासंदर्भात मुंबई महापालिका प्रशासनानं सांगितलं की, कोस्टल रोड प्रकल्पाला इस्त्राईलच्या वाहतूक आणि रस्ते सुरक्षा मंत्री मिरी रेगेव यांनी आज भेट दिली. या सोबतच मिरी रेगेव्ह यांनी हाजी अली येथील आंतरमार्गिका, प्रियदर्शनी पार्कपासून ते पारसी जिमखान्यापर्यंत भूमिगत बोगद्याची पाहणीही केली. यावेळी मंत्री मिरी रेगेव यांनी पालिकेच्या या प्रकल्पाचं कौतुक केल्याची माहितीदेखील प्रशासनानं दिलीय. मंत्री मिरी रेगेव म्हणाल्या, "या प्रकल्पाची भव्यता डोळे दीपवून टाकणारी आहे. मुंबईला लाभलेल्या सागरी किनाऱ्याचा दळणवळणासाठी योग्य वापर केलाय. कामाची गुणवत्ता अनुकरणीय आहे. उड्डाणपूल, भूमिगत बोगदे, त्यात अत्याधुनिक यंत्रणा यांचा समावेश हे सर्व कौतुकास पात्र आहे." अशा शब्दात कामाचं कौतुक केल्याचं पालिकेनं म्हटलंय.

कामगारांची थोपटली पाठ : मिरी रेगेव्ह यांनी कोस्टल रोड प्रकल्प ठिकाणी कामगारांशीदेखील संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, 'तुमच्या हातांनी प्रचंड मोठं काम केलंय. भविष्यात आमच्या देशाला तुमची गरज भासेल. अशाप्रकारचं भव्य प्रकल्प उभारण्यासाठी आम्हाला नक्की सहकार्य करा’, अशा शब्दात त्यांनी कामगारांची पाठ थोपटली. तसंच काही कामगारांसोबत सेल्फीदेखील घेतली. मुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात कुलाबा परिसरातील नरिमन हाऊस इथं नागरिकांचा जीव गेला. त्यांना सोडविण्यासाठी आलेल्या सैनिकांपैकी काहींना वीरमरण आलं. इस्त्राईलच्या वाहतूक आणि रस्ते सुरक्षा मंत्री मिरी रेगेव्ह यांनी नरिमन हाऊस येथे भेट देत त्यांना श्रद्धांजलीदेखील अर्पण केली.

हेही वाचा :

  1. 'अटल सेतू'नंतर मुंबईकरांना मिळणार 'कोस्टल रोड'चं गिफ्ट; उद्घाटनावरुन आदित्य ठाकरेंची राज्य सरकारवर टीका
  2. 31 जानेवारीला कोस्टल रोड होणार सुरू- मुख्यमंत्र्यांची घोषणा
  3. Mumbai Coastal Road Name : मुंबई सागरी महामार्गाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव; मुख्यमंत्र्यांची घोषणा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.