ETV Bharat / state

फक्त योग दिनालाच योग करून चालणार नाही, नियमित योग करा.. रामदास आठवले - International Yoga Day 2024 - INTERNATIONAL YOGA DAY 2024

International Yoga Day 2024 जगभरात आज 'योग दिन' साजरा करण्यात येतोय. यानिमित्त केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील 'योग दिन' साजरा केला. याप्रसंगी त्यांनी योगाचार्य राजर्षी बोरा यांच्या आग्रहास्तव बासरी देखील वाजवली.

International Yoga Day 2024
आंतरराष्ट्रीय योग दिवस 2024 (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 21, 2024, 2:11 PM IST

Updated : Jun 21, 2024, 2:56 PM IST

योग प्रात्यक्षिकं करताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले (ETV Bharat Reporter)

मुंबई International Yoga Day 2024 : मी दररोज योग करत असतो. त्यामुळे कधीही आजारी पडत नाही. म्हणून फक्त 'योग दिना'लाच योग करून चालणार नाही दररोज योग करा असं आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जनतेला केलं आहे. ते फाईव्ह गार्डन मधील पालनकोट हॉल येथे आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते. 'आंतरराष्ट्रीय योग दिना'चं औचित्य साधत मुंबईत अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

आठवले यांनी वाजवली बासरी : 'योग दिना'निमित्त वाराणसी येथून आलेल्या योगाचार्य राजर्षी बोरा यांनी यावेळी बासरीवादन केलं. योगाचार्यांच्या आग्रहास्तव रामदास आठवले यांनीदेखील बासरी वाजवली. याप्रसंगी स्थानिक नागरिकांनी पालनकोट हॉलमध्ये बासरीच्या सुरांवर योगासनं केली.

दररोज योगासनं करावी : आपल्या जीवनात योगाचे खूप महत्त्व आहे. शरीर रोगमुक्त, आनंदी जीवन, शरीर सुदृढ बनवायचं असेल तर योग अत्यंत आवश्यक असल्याचं आठवले यांनी म्हटलं आहे. देशाच्या पंतप्रधानपदी 2014 साली नरेंद्र मोदी विराजमान झाल्यानंतर त्यांच्या संकल्पनेतून दरवर्षी 21 जूनला 'आंतरराष्ट्रीय योग दिवस' साजरा केला जात आहे. फक्त 'योग दिना'लाच योग करून चालणार नाही तर दररोज एक ते दीड तास योगासनं करावी, असं आवाहनदेखील त्यांनी यावेळी जनतेला केलं. आपण देखील दररोज योग करत असतो. त्यामुळे कधीही आजारी पडत नाही. दौऱ्यामुळे अनेक ठिकाणी जावं लागतं धावपळ होत असते मात्र, योगामुळे मी कायम फिट राहतो, असंही त्यांनी सांगितलं.

योग दिन साजरा : जगभरात २१ जून हा 'आंतरराष्ट्रीय योग दिन' म्हणून साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संयुक्त राष्ट्रांच्या ६९ व्या महासभेत 'आंतरराष्ट्रीय योग दिन' साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडला होता. त्यांनतर २१ जून २०१५ रोजी पहिला 'योग दिन' साजरा करण्यात आला. आज पंतप्रधान मोदींनी श्रीनगरमध्ये १० वा 'आंतरराष्ट्रीय योग दिन' साजरा केला.

हेही वाचा

  1. आंतरराष्ट्रीय योग दिन 2024 : उंच बर्फाळ प्रदेशात भारतीय जवानांची योगासनं
  2. 'आंतरराष्ट्रीय योग दिना'चा काय आहे इतिहास, जाणून घ्या, योगचे महत्त्व आणि फायदे
  3. योग दिनानिमित्त प्रथमच दिव्यांग मुलांसाठी योगाभ्यास वर्ग

Last Updated : Jun 21, 2024, 2:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.