ETV Bharat / state

शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता वाढवण्यासाठी 'चरख्या'चा उपयोग; यामागचं नेमकं लॉजिक काय? - Nagpur School Unique Initiative

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 4, 2024, 1:41 PM IST

Nagpur School Special Activity : विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता वाढवण्यासाठी नागपूरच्या चंदादेवी सराफ या शाळेनं अनोखा उपक्रम सुरू केलाय. त्यामुळं या शाळेची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

Nagpur School Special Activity
नागपूरच्या शाळेचा अनोखा उपक्रम (Source reporter)

नागपूर Nagpur School Special Activity : नागपूर शहरातील चंदादेवी सराफ या शाळेनं एक अभिनव उपक्रम हाती घेतलाय. तसंच या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता आणि संयमाची भावना वाढल्याचं शाळेनं सांगितलंय. विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता वाढवण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 'चरख्या'चा उपयोग शाळेच्या वतीनं करण्यात आलाय. गेल्या वर्षभरापासून या शाळेतील विद्यार्थी चरखाच्या माध्यमातून 'संयम' शिकत आहेत. त्यांच्यातील एकाग्रता वाढलीय. दरम्यान, हा चमत्कार घडला कसा? या विशेष आपण जाणून घेऊया.

ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळं विद्यार्थ्यांवर परिणाम : कोरोनाची दहशत आता जरी संपली असली तरी त्याचे दुष्परिणाम मात्र अजूनही जगभरात जाणवत आहेत. कोरोना काळात भारतासह जगातील शिक्षण व्यवस्था ऑनलाईन झाली होती. ऑनलाईन शिक्षणादरम्यान विद्यार्थी पुढच्या वर्गात गेले असले तरी त्याचे अत्यंत गंभीर दुष्परिणाम हे आता अगदी स्पष्ट दिसू लागलेत. अभ्यासाच्या पुस्तकांसह मैदानी खेळामध्ये रमणारे विद्यार्थी आता पुस्तकांपासून दुरावत आहेत. ऑनलाईन शिक्षणामुळं त्यांच्या हाती मोबाईल, लॅपटॉप सारखे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आल्यामुळं ते ऑनलाईनच्या मोहजाळ्यात अडकले. त्यामुळं प्रत्यक्षात शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांमधील संयम आणि एकाग्रता कमी झाल्याचं पाहायला मिळालं.

नागपूरच्या शाळेत विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता वाढविण्यासाठी 'चरख्या'चा उपयोग (Source reporter)

...म्हणून सुरू केला 'चरखा' उपक्रम : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रभाव चंदादेवी सराफ शाळेच्या संचालिका निशा सराफ यांच्यावर असल्यानं त्यांना चरख्याचं महत्त्व आणि त्याचा उपयोग माहित होता. त्यामुळं त्यांनी शाळेत चरखा खोली तयार केली. तसंच या खोलीत विद्यार्थ्यांना बंधन लागू न करता स्वतःच्या आवडीनं वेळ घालवण्याची मुभा दिली. त्यामुळं विद्यार्थ्यांच्या वागणुकीत आणि व्यवहारात कमालीचा फरक पडला आहे. त्यांच्या कामात संयम दिसत असल्याचं निरीक्षण शाळेनं नोंदवलंय.

विद्यार्थी आत्मसात करताय गांधीचे विचार : महात्मा गांधी अहिंसेच्या मार्गानं ब्रिटिशांशी लढले. त्यावेळी त्यांचा चरखा हे स्वातंत्र्यलढ्याचं प्रतीक म्हणून सर्वांच्या परिचयाचे झाले होते. तोच चरखा त्या काळातील लोकांच्या आर्थिक स्वावलंबनाचा एक प्रमुख साधनदेखील होता. महात्मा गांधीच्या चरख्याची भूमिका विद्यार्थ्यांना पटू लागलीय. या चरख्याच्या माध्यमातून विद्यार्थी महात्मा गांधींचे विचारही आत्मसात करू लागलेत. हा उपक्रम सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांची कमी प्रतिसाद होता. मात्र, आता ही संख्या शंभराच्या जवळ जाऊन पोहोचलीये.

हेही वाचा -

  1. 'झेडपी'ची पोरं लय भन्नाट; कोडिंगचा वापर करून बनवलं ॲप, गेम अन् अ‍ॅनिमेशन
  2. शिकायची हौस अशी की आजीबाई गिरवताय 'ग म भ न' चे धडे; 16 हून अधिक आजीबाई होणार साक्षर
  3. आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू; ऑनलाईन अर्ज भरताना पालकांनी 'ही' चूक करू नये - RTE Admission

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.