ETV Bharat / state

चक्रीवादळात अडकली टीम इंडिया; खेळाडूंना मायदेशात आणण्यासाठी बीसीसीआयनं उचलले 'हे' पाऊल - BCCI Update on Hurricane Beryl - BCCI UPDATE ON HURRICANE BERYL

Indian Cricket Team : T20 विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ एका विचित्र वादळात अडकला आहे. त्यामुळे भारतीय संघाचे खेळाडू मायदेशी परतू शकलेले नाहीत. खेळाडुंना परत आणण्यासाठी बीसीसीआयनं पावले उचलली आहेत.

Team India stuck in barbados
Team India stuck in barbados (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 2, 2024, 9:14 AM IST

Updated : Jul 2, 2024, 10:31 AM IST

Indian Cricket Team stuck in barbados : टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियाचे भारतात स्वागत करण्यासाठी क्रिकेटप्रेमी उत्सुक आहे. मात्र, टीम इंडिया मोठ्या संकटात सापडली आहे. अंतिम सामना झालेल्या बार्बाडोस शहरात बेरील चक्रीवादळाने कहर केलाय. त्यामुळं भारतीय खेळाडू तिथेच अडकले आहेत. बार्बाडोसमधील चक्रीवादळामुळे वीज आणि पाणीपुरवठा ठप्प झाला. त्यामुळे विमानतळही बंद करण्यात आलं आहे.जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड भारतीय असलेल्या क्रिकेक नियामक मंडळनं (BCCI) खेळाडूंना मायदेशात आणण्यासाठी विशेष विमान पाठवणार आहे. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी ही माहिती दिलीय.

काय म्हणाले जय शाह ?: बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी माध्यमांना सांगितले की, "खेळाडूंना सुरक्षितपणे बाहेर देशात आणण्याची योजना करत आहेत. बीसीसीआय सोमवारी चार्टर्ड विमानाने बार्बाडोस सोडण्याचा प्रयत्न करत होते. परंतु विमानतळ बंद करण्यात आल्यामुळे खेळाडूंना तिकडेच राहाव लागलं. बोर्ड चार्टर्ड विमानं चालवणाऱ्या कंपन्यांच्या संपर्कात आहे. बार्बाडोस विमानतळ सुरू होताच टीम अमेरिका किंवा युरोपला रवाना होईल."

वादळाची स्थिती कायम : भारतीय क्रिकेट संघातील खेळाडुंना मंगळवारीही बार्बाडोसमधुन बाहेर पडण कठीण आहे. कारण तेथे अजूनही वादळाची स्थिती कायम आहे. बीसीसीआय विमानतळ कंपन्यांच्या संपर्कात असल्याची माहिती जय शाह यांनी माध्यमांना दिली. विमानतळाचे काम सुरू होताच टीम इंडिया चार्टर्ड विमानाने अमेरिका किंवा युरोपला जाणार आहे. यानंतर टीम इंडिया तिथून भारतात येईल. मात्र वाऱ्याचा वेग कमी होईल, तेव्हा हे शक्य होणार आहे, असे जय शाह यांनी सांगितले.

भारतानं विश्वचषक जिंकल्यानंतर संपूर्ण देशात जल्लोष पाहायला मिळाला. खेळाडूंनी मैदानावर सेलिब्रेशन केलं, तर भारतातील क्रिकेट प्रेमींनी रस्त्यावर फटाके फोडून, तिरंगा फडकवून सेलिब्रेशन केलं. भारतीय खेळाडू मायदेशी आल्यावर त्यांच भव्य स्वागत होणार आहे. यापूर्वी 2011 मध्ये भारतानं वनडे विश्वचषक जिंकला त्यावेळी मुंबईत मिरवणुक काढण्यात आली होती. बार्बाडोस शहरात अडकलेले खेळाडू आता कधी येतात? याची क्रिकेटप्रेमी वाट पाहत आहेत.

भारतीय संघानं जिंकला चौथा आयसीसी विश्वचषक : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं चौथ्यांदा विश्वचषक (एकदिवसीय, टी 20) जिंकला आहे. भारतीय संघानं शनिवारी (29 जून) टी 20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला. या विजयामुळं 140 कोटी भारतीयांना आनंद साजरा करण्याची सुवर्णसंधी मिळाली. भारतीय संघानं दोनदा (1983, 2011) एकदिवसीय विश्वचषक जिंकला आहे. तर त्यांनी फक्त दोनदा (2007, 2024) टी 20 विश्वचषक जिंकला आहे. संघानं शेवटचा विश्वचषक (एकदिवसीय मध्ये) 2011 मध्ये जिंकला होता. आता 13 वर्षांनंतर कोणथातरी विश्वचषक (टी 20 मध्ये) जिंकला आहे.

हेही वाचा

  1. "तुझ्याशिवाय हे शक्य झालं नसतं...", विश्वचषक जिंकल्यानंतर विराटची अनुष्का शर्मासाठी खास पोस्ट - Virat Kohli Instagram Post
  2. विश्वविजेत्या भारतीय संघावर बक्षिसांचा वर्षाव; खेळाडू होणार मालामाल, बीसीसीआयनं केली मोठी घोषणा - Prize Money For Team India
  3. माझ्याकडं शब्द नाहीत, रोहितनं जगातला सर्वात श्रीमंत माणूस बनवलं; विश्वविजयानंतर काय म्हणाले रोहितचे कोच दिनेश लाड? - Dinesh Lad Exclusive Interview
  4. विराट कोहली, रोहित शर्मानंतर आता 'सर'ही टी20 क्रिकेटमधून निवृत्त - Ravindra Jadeja Retirement

Last Updated : Jul 2, 2024, 10:31 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.