ETV Bharat / state

नागपुरात सैन्य जवानांच्या ऑटोला खासगी बसची धडक; दोन जवानांचा मृत्यू - Bus Auto Accident Nagpur - BUS AUTO ACCIDENT NAGPUR

Bus Auto Accident Nagpur : नागपुरात सैन्य जवानांच्या ऑटोला खासगी बसनं धडक दिल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनतेत दोन जवानांचा मृत्यू झाला असून 6 जण गंभीर जखमी झाले आहेत.

private bus hit an auto-rickshaw
जवानांच्या ऑटोला खासगी बसची धडक (ETV BHARAT Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 16, 2024, 10:10 PM IST

Updated : Jun 16, 2024, 10:36 PM IST

नागपूर Bus Auto Accident Nagpur : कन्हान शहरातून साहित्य खरेदी केल्यानंतर कामठी शहरात येणाऱ्या सैनिकांच्या ऑटोला विरुद्ध दिशेनं येणाऱ्या भरधाव वाहनानं धडक दिलीय. या घटनेत दोन जवानाचा मृत्यू झाला असून 6 जवान गंभीर जखमी झाले आहेत. कामठी (जुनं) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कन्हान नदीच्या पुलावर रविवारी ही घटना घडली.

खाजगी बसची ऑटोला जोरदार धडक : विघ्नेश तसंच धीरज रॉय असं मृत जवानांची नाव असून बाकीच्या जवानांची नावं कळलेली नाहीत. कामठी शहरातील आर्मी ट्रेनिंग सेंटरमधील काही जवान कन्हान येथे साहित्य खरेदीसाठी गेले होते. खरेदी झाल्यानंतर ते परत जाण्यासाठी दोन ऑटोनं निघाले होते. त्यातील ऑटो क्रमांक एमएच-49/एआर -4733 कन्हान नदीच्या पुलावर येत होता, तेव्हा नागपूरहून मध्यप्रदेशकडं वेगानं जाणाऱ्या एमएच-31/एफसी-4157 या खाजगी बसनं ऑटोला जोरदार धडक दिली. त्यात आठ जवान गंभीर जखमी झाले. त्यातील दोन जवानाचा मृत्यू झाला आहे.

ऑटो चालकासह जवान गंभीर जखमी : या घटनेत दुसऱ्या ऑटोतून आलेल्या सैनिकांनी सर्व जखमींना तातडीनं कामठी सैनिक प्रशिक्षण केंद्र रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केलंय. तिथं प्राथमिक उपचार केल्यानंतर ऑटोचालकासह पाच जवानांना नागपूर शहरातील मेयो रुग्णालयात हलविण्यात आलंय. याउलट अन्य तिघांना कामठी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

दोन जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू : मेयो रुग्णालयात दोन सैनिकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आहे. मात्र, जवानाच्या मृत्यूबाबत आद्याप भारतीय सैन्य दलानं अधिकृत माहिती दिलेली नाहीय. या अपघातातील तिघांना नागपूरच्या वैद्यकीय रुग्णालयाच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आलंय. या तिघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. याप्रकरणी कामठी (जुनं) पोलिसांनी ट्रॅव्हल्स चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

'हे' वाचलंत का :

  1. भरधाव कारनं 5 जणांना चिरडलं, दोघांची प्रकृती चिंताजनक - 5 people crushed by car
  2. चामुंडा स्फोट प्रकरण : आणखी एका मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू, मृतांची संख्या आठ - Chamunda Blast Case
  3. नागपूर हिट अँड रन हत्या प्रकरण : अर्चना पुट्टेवारचा मोबाईल फोन जप्त, धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता - Nagpur Hit And Run Murder Case

Last Updated : Jun 16, 2024, 10:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.