ETV Bharat / state

सिंहगडावर रंगणार भारतातील पहिली 'एव्हरेस्टिंग स्पर्धा'; 16 वेळा सर करावा लागणार सिंहगड - PUNE EVERESTING COMPETITION

3 डिसेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत एव्हरेस्टिंग स्पर्धा होणार असल्याची माहिती सिंपल स्टेप्सचे संस्थापक आशिष कासोदेकर यांनी दिली.

PUNE EVERESTING COMPETITION
भारतातील पहिली एव्हरेस्टिंग स्पर्धा पुण्यात (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 10, 2024, 9:13 PM IST

पुणे : महाराष्ट्र पर्यटन विभाग आणि सिम्पल स्टेप्स फिटनेस संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं सिंहगड किल्ल्यावर भारतातली पहिली एव्हरेस्टिंग स्पर्धा होणार आहे. 13 डिसेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत ही स्पर्धा होणार असल्याची माहिती सिंपल स्टेप्सचे संस्थापक आशिष कासोदेकर यांनी दिली. या स्पर्धेची माहिती देण्याकरिता आज (10 डिसेंबर) पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी आशिष कासोदेकर यांनी स्पर्धेबाबत माहिती दिली.

दोन विभागात स्पर्धक सहभागी होऊ शकतात : 16 वेळा सिंहगड सर करावा "एव्हरेस्टिंग स्पर्धेत स्पर्धकांना माउंट एव्हरेस्टची उंची 8848 मीटर सिंहगड चढून सर करायची आहे. त्यामुळं स्पर्धकांना लागोपाठ 16 वेळा सिंहगड सर करावा लागेल. पूर्ण एव्हरेस्टिंग (सोळा वेळा) व अर्थ एव्हरेस्टिंग (आठ वेळा) अशा दोन विभागात यात स्पर्धक सहभागी होऊ शकतात. स्पर्धक स्वतंत्र रीतीनं अथवा टीम करून देखील सहभागी होऊ शकतात. नवोदितांसाठी यामध्ये फन रन / वॉक हा पर्याय देखील उपलब्ध आहे. या पर्यायात स्पर्धक पौर्णिमेच्या रात्री म्हणजे 14 डिसेंबरला एकदा सिंहगड सर करतील," अशी माहिती यावेळी सिंपल स्टेप्स चे संस्थापक आशिष कासोदेकर यांनी दिली.

भारतातील पहिली एव्हरेस्टिंग स्पर्धा पुण्यात (Source - ETV Bharat Reporter)

स्पर्धकांना मेडल देण्यात येणार : "सर्व स्पर्धक घाट रस्त्यानं सिंहगड सर करणार आहेत. त्यामुळं स्पर्धेच्या कालावधीत सिंहगड घाट रस्ता वाहतुकीसाठी (अत्यावश्यक सेवेतील वाहनं वगळता) पूर्णपणे बंद असेल. महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरचे अनेक स्पर्धक यामध्ये सहभाग घेणार आहेत. तसंच स्पर्धेच्या ठिकाणी सर्व स्पर्धकांना रूट सपोर्ट, स्पर्धा कालावधीत जेवण व वैद्यकीय सेवा याचीही सोय केली जाईल. स्पर्धा पूर्ण करणाऱ्या सर्व यशस्वी स्पर्धकांना मेडल देण्यात येईल. पतंजली आत्मबोध वेलनेस सेंटर हा स्पर्धेचा बेस कॅम्प व स्टार्ट पॉइंट असणार आहे. यानिमित्त या सेंटरतर्फे आरोग्य विषयक कार्यशाळा स्पर्धकांसाठी घेतल्या जातील," अशी माहिती यावेळी महाराष्ट्र पर्यटन विभागाचे उपसंचालक शमा पवार यांनी दिली.

हेही वाचा

  1. प्रदूषणमुक्त प्रवासच आता प्रवाशांच्या जीवावर! कंत्राटीकरण पद्धत किती दिवस बळी घेणार?
  2. इलेक्ट्रॉनिक बस अपघातांमध्ये वाढ, नेमकं जबाबदार कोण?
  3. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या मतांमध्ये तफावत? निवडणूक आयोगानं दिलं थेट स्पष्टीकरण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.