ETV Bharat / state

'इंडिया' आघाडी पत्रकार परिषद : पंतप्रधान मोदींना अद्यापही नवाज शरीफांच्या केकची आठवण; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले संघावर घालतील बंदी - India Alliance Press Conference

India Alliance Press Conference : 'इंडिया' आघाडीची पत्रकार परिषद मुंबईत सुरू आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, उद्धव ठाकरे, संजय राऊत आदी या पत्रकार परिषदेत हजर आहेत.

India Alliance Press Conference
संपादित छायाचित्र (ETV Bharat Marathi)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 18, 2024, 10:40 AM IST

Updated : May 18, 2024, 8:27 PM IST

प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे आणि मल्लिकार्जुन खरगे (Mumbai Reporter)

मुंबई India Alliance Press Conference : लोकसभा निवडणूक 2024 च्या पाचव्या टप्प्याच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत रोड शो केल्यानंतर आज इंडिया आघाडीची पत्रकार परिषद सुरू आहे. भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई आणि महाराष्ट्रात सभा आणि रोड शो करत आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे समाजाला तोडण्याचं काम करतात, असा हल्लाबोल मल्लिकार्जुन खरगे यांनी यावेळी केला. तर उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अद्यापही पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या केकची आठवण होते. त्यामुळे ते निवडणुकीत वारंवार पाकिस्तानचं नाव घेतात, अशी टीका त्यांनी केली. जे पी नड्डा यांनी भाजपाला आता संघाची गरज नसल्याचं स्पष्ट केलं. यावर बोलताना त्यांनी भाजपा आता संघावर बंदी घालेल, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

पंतप्रधान मोदींना अद्यापही नवाज शरीफच्या केकची आठवण : भाजपा निवडणूक आली की पाकिस्तानची भीती दाखवते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नवाज शरीफ यांच्या केकची आठवण येते. जम्मू काश्मीरचे राज्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्याबाबत गंभीर आरोप केले आहेत, ते गंभीर आहेत. भाजपानं निवडणुका जिंकण्यासाठी पुलवामा हल्ला घडवून आणला होता का, असा सवाल आहे.

भाजपा संघावर बंदी घालू शकतं, उद्धव ठाकरेंचा आरोप : भाजपा आता स्वयंपूर्ण पक्ष झाला आहे. आता भाजपाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज नसल्याचं स्पष्ट केल्याची बातमी माध्यमातून आली आहे. याबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपा आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही बंदी घालू शकते, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. भाजपावाले आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही भाजपा आता नकली म्हणतील, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

देशभक्त शब्दाला आक्षेप घेणारे देशद्रोही : यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "माझ्या देशभक्त या शब्दाला जे आक्षेप घेत आहेत, ते देशद्रोही आहेत. कारण कोणता हिंदू हा देशभक्त नाही हे मला दाखवा. जो हिंदू आहे तो देशभक्त असणारच याची मला खात्री आहे. तसेच पंतप्रधान पदासाठी आमच्याकडं चेहरा नाही, आमचा पंतप्रधान दरवर्षी बदलेल असं ते म्हणतात. याचा अर्थ त्यांनी आमचं सरकार येणार हे मान्य केलं आहे," असा टोला त्यांनी लगावला. आमच्याकडं पंतप्रधानपदासाठी अनेक चेहरे आहेत, मात्र त्यांच्याकडं मोदी शिवाय पर्याय नाही आणि म्हणून भाजपाची अडचण झाली आहे," असंही ठाकरे यावेळी म्हणाले.

हेही वाचा :

  1. महाराष्ट्राच्या अस्मितेचा बदला घ्यायचा असेल तर इंडिया आघाडीला मतदान करा - अरविंद केजरीवाल - lok sabha election
  2. गिरीश महाजन यांच्याकडं लोण्याचं मडकं, कुठं लोणी लावतात सांगणार नाही; वडेट्टीवारांची महाजनांवर टीका - Vijay Wadettiwar
  3. देशात 'इंडी' आघाडी सत्तेत आल्यास 'मिशन कॅन्सल', मोदींनी सांगितला इंडिया आघाडीचा प्लॅन - Narendra Modi Beed Sabha

Last Updated : May 18, 2024, 8:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.