मुंबई INDIA Alliance Complaint to SEBI : लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी शेअर बाजार निर्देशांकांत वाढ होईल. त्यामुळं शेअर बाजारात गुंतवणुकदारांनी मोठी गुंतवणूक करावी, असं मोदी-शहांनी म्हटलं होतं. या वक्तव्याविरोधात आज (मंगळवारी) इंडिया आघाडीच्या नेत्यांनी 'सेबी'कडं तक्रार दाखल केली. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत, तृणमूल काँग्रेसचे साकेत गोखले, सागरिका घोष, कल्याण बनर्जी, विद्या चव्हाण आदी नेते उपस्थित होते. पण त्यापूर्वी शरद पवारांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली.
कारवाईची मागणी : सेबीकडे तक्रार दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना इंडिया आघाडीचे नेते म्हणाले की, शेअर बाजारातील गोपनीय माहिती किंवा विशिष्ट शेअर वधारेल याची गुंतवणूक करा किंवा या दिवशी शेअर बाजारात गुंतवणूक करावी, असं आवाहन करणे हे अत्यंत चुकीच आहे. सेबीच्या नियमांच्या विरोधात आहे. सरकारमध्ये गृहमंत्री पदावर राहणाऱ्या व्यक्तीने गुंतवणूकदारांना प्रभावित करण्यासाठी असं आवाहन करणे हे नियमबाह्य असल्याचं इंडिया आघाडीतील नेत्यांनी म्हटलंय. त्यामुळं मोदी-शहांवर कडक कारवाई झाली पाहिजे. तसेच भाजपाच्या इक्जिट पोलची आणि स्टॉक मार्केट घोटाळ्याची चौकशी करा, अशी मागणी आम्ही सेबीकडे केली असल्याचं इंडिया आघाडीतील नेत्यांनी म्हटलंय.
सेबीच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष : दुसरीकडे इंडिया आघाडीतील नेत्यांनी मोदी-शहांच्या विरोधात सेबीकडे तक्रार दाखल केली आहे. मात्र सेबी ही स्वायत्तसंस्था असून, सेबी ही केंद्र सरकारच्या अखात्यारित आहे. शेअर बाजारातील भाकीत करणे, लोकांना आवाहन करणे, शेअर खरेदी करा असं सांगणे मोदी-शहाना भोवणार का?, किंवा त्यांच्यावर कारवाई होणार का? किंवा मोदी-शहांवर सेबी कोणती कारवाई करणार, याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सेबीच्या कार्यालयात तक्रार दाखल : लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी शेअर बाजारात मोठी तेजी निर्माण होईल, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक निकालापूर्वी केला होता. प्रत्यक्षात लोकसभा निवडणुकीच्या निकालादिवशी शेअर बाजारात मोठी पडझड झाली. त्यावर शेअर बाजारात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला होता. या प्रकरणी इंडिया आघाडीचे नेते आज मुंबईतील सेबीच्या कार्यालयात तक्रार दाखल केली आहे. सेबी ही शेअर बाजाराचं नियमन करणारी केंद्र सरकारची स्वायत्त संस्था आहे.
शेअर बाजारातील घोटाळ्याची चौकशी : राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनी एक्स मीडियावर पोस्ट करत तृणमुल काँग्रेसच्या खासदारांच्या भेटीबाबत माहिती दिली. त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं, "एक्झिट पोल दरम्यान झालेल्या शेअर बाजारातील घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी करण्यासाठी तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी, सागरिका घोष आणि साकेत गोखले मुंबईत आले आहेत." सिल्व्हर ओक येथील भेटीदरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत, खासदार सुप्रिया सुळे आणि माजी आमदार विद्या चव्हाण उपस्थित होते.
- शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत म्हणाले, "सर्वोच्च न्यायालयानं सेबीला या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितलं आहे. आता तपासाची अपेक्षा करत आहोत. ही एक राजकीय नेत्यांकडून झालेली फसवणूक आहेत. सर्वसामान्यांचे 13 लाख कोटी रुपये बुडाले आहेत. एक्झिट पोलचा त्यांच्याशी असलेला संबंध ही अत्यंत गंभीर बाब आहे. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे."
- तृणमुल पक्षाचे नेते कल्याण बॅनर्जी म्हणाले, "निवडणुकीदरम्यान, अमित शाह यांनी वारंवार शेअर खरेदी करण्यास सांगितलं. 4 जून रोजी शेअर वधारणार असल्याचं सांगितलं. एक्झिट पोल मीडियाकडून करण्यात आले. लोकांमधील आत्मविश्वास टिकविण्यासाठी सेबीकडून तपासाची गरज आहे."
काय आहे आरोप? : लोकसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे सुमारे 30 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. याबाबतचे भाजपानं विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. बनावट एक्झिट पोलचा वापर करून शेअर बाजारात कसा घोटाळा झाला, याबाबतची चौकशी करावी, अशी पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री आणि तृणमुल काँग्रेसच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मागणी केली होती.
- "सेबी ही शेअर बाजारावर नियंत्रण ठेवते. कोणतेही अनैतिक किंवा बेकायदेशीर गोष्टींबद्दल कोणतीही तक्रार असेल, फक्त सेबीच हस्तक्षेप करू शकते," असे मत शरद पवार गटाच्या नेत्या निर्मला सामंत प्रभावळकर यांनी व्यक्त केलं.
हेही वाचा-