मुंबई Police President Medal : 2020 मध्ये गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत हुतात्मा झालेले महाराष्ट्राचे पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमाने यांचा स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला 'शौर्य पदक' प्रदान करण्यात येणाऱ्या राज्यातील 17 पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे.
केंद्र सरकारनं बुधवारी विविध केंद्रीय आणि राज्य दलातील 1,037 पोलीस कर्मचाऱ्यांना सेवा पदकं जाहीर केली. महाराष्ट्र पोलीस दलासाठी एकूण 59 पदकांची घोषणा करण्यात आली आहे. त्यापैकी 17 शौर्य, 3 विशिष्ट सेवेसाठी आणि 39 गुणवत्तापूर्ण सेवेसाठी आहेत.
- पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमाने हे भामरागड क्विक रिस्पॉन्स टीमचे (क्यूआरटी) प्रभारी होते. मे 2020 मध्ये गडचिरोली येथे नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत ते C-60 कमांडो किशोर आत्राम यांच्यासह त्यांनी हौतात्मय आले होते. त्यांना 'मरणोत्तर शौर्य' पदक प्रदान करण्यात येणार आहे.
या अधिकाऱ्यांना पदक होणार प्रदान : 'पोलीस शौर्य' पदकांमध्ये कुणाल सोनावणे (उप-विभागीय पोलीस अधिकारी), दीपक आवटे (पोलीस उपनिरीक्षक), धनाजी होनमाने (मरणोत्तर) (पोलीस उपनिरीक्षक), नागेशकुमार मदरबोईना (नाईक पोलीस शिपाई), शकील शेख (पोलीस शिपाई), विश्वनाथ पेंदाम (पोलीस शिपाई), विवेक नरोटे (पोलीस शिपाई), मोरेश्वर पोटावी (पोलीस शिपाई), कैलाश कुळमेथे (पोलीस शिपाई), कोटला कोरामी (पोलीस शिपाई), कोरके वेलादी (पोलीस शिपाई), महादेव वानखेडे (पोलीस शिपाई), अनुज तारे (आयपीएस) (अतिरिक्त पोलीस अधीक्षक), राहुल देव्हाडे (पोलीस उपनिरीक्षक), विजय सकपाळ (पोलीस उपनिरीक्षक), महेश मिच्छा (मुख्य शिपाई), समय्या आसाम (नाईक पोलीस शिपाई) यांचा समावेश आहे. 'विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस' पदकांमध्ये राज्याचे चिरंजीवी प्रसाद (अतिरिक्त पोलिस महासंचालक), राजेंद्र डहाळे (संचालक), सतीश गोवेकर (सहाय्यक पोलीस आयुक्त) यांचा समावेश आहे. अतिरिक्त पोलिस आयुक्त दत्ता शिंदे, उपमहानिरीक्षक संदीप दिवाण, पोलिस उपअधीक्षक शिवाजी फडतरे, विनीत चौधरी, पोलिस अधीक्षक संजय खाडे यांचा समावेश 'गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक' मिळवणाऱ्या 39 पोलिस अधिकाऱ्यांमध्ये समावेश आहे.
हेही वाचा
- 'ऐ मेरे वतन के लोगो' गीत अजरामर, दुर्लक्षित संगीतकार सी. रामचंद्रांचे गावात स्मारक उभारण्याची वंशजांची मागणी - Independence Day 2024
- सुप्रीम पंतप्रधानांचा दबाव असल्यानं शनिवार वाडा दत्तक देण्याचा केंद्राचा निर्णय-हिंदू महासंघ - Adopt a Heritage scheme
- अप्पर वर्धा धरण: स्वातंत्र्यदिनानिमित्त धरणाचा खास 'नजारा' - Amravati Upper Wardha Dam