ETV Bharat / state

महाराष्ट्रात वाढलेली मतदानाची टक्केवारी महायुतीला तारक, सत्ताविरोधी लाटेचं समीकरण राज्यात फोल

राज्यात वाढलेल्या मतदानच्या टक्केवारीनं सत्ताधाऱ्यांना बळ दिलं. सत्ताविरोधी लाट म्हणजे जास्त मतदान ही सर्वसाधारण समजूत यामुळे फोल ठरली आहे.

प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 3 hours ago

मुंबई : यावेळी विधानसभा निवडणुकीत राज्यात झालेल्या मतदानाची टक्केवारी सगळीकडेच वाढल्याचं दिसून आलं. राज्यात सरासरी 66.05 टक्के मतदानाची नोंद झाल्याची माहिती आजच्या निवडणूक आयोगाच्या साईटवरील माहितीवरुन मिळते. यातही सर्वाधिक मतदान ग्रामीण महाराष्ट्रात झालं. तर सर्वात कमी मतदान शहरी भागात झाल्याचं आकडेवारीवरुन दिसून आलं. 1995 नंतर प्रथमच राज्यात विक्रमी मतदान झाल्याची निवडणुकीच्या माध्यमातून नोंद झाली. गेल्या ३० वर्षातील निवडणुकींचा विचार करता महाराष्ट्रात यंदा 30 वर्षांतील सर्वाधिक मतदान झालं. राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर बदललेली राजकीय समीकरणे पाहता वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीचा फायदा कुणाला होईल याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. त्याचवेळी मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीचा फायदा भाजपा आणि महायुतीला होणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं. आज निकालामध्ये तेच स्पष्टपणे दिसून येत आहे.

वाढलेलं मतदान सरकारच्या पदरात : राज्यात यंदा दीडशेच्यावर पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले. यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांनी आपापल्या विजयाचा दावा केला. वाढलेल्या मतदानानं महाविकास आघाडीला हात दाखल्याचं मतमोजणीत स्पष्ट दिसत आहे. मतमोजणीपूर्वी वाढलेलं मतदान हे सरकारविरोधात असल्याची चर्चा होती. कारण आतापर्यंत वाढलेल्या मतदानाचा फटका हा सरकार विरोधात असतो, असाच ट्रेंड दिसून आला आहे. काही अपवादात्मक परिस्थिती बघता वाढीव मतदान हे सरकार बदलण्यासाठी असतं. मात्र या निवडणुकीत हे मतदान सत्ताधाऱ्यांनाच साथ देणारं ठरत आहे.

मतदानाची टक्केवारी का वाढली? : लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली. अशा प्रकारच्या योजनेचा फायदा नुकत्याच झालेल्या मध्यप्रदेशच्या निवडणूक निकालात दिसून आला. कदाचित ही योजनाच मतदानाची टक्केवारी वाढण्यास कारणीभूत ठरली असं प्रथमदर्शनी तरी दिसतय. महायुतीचा महायश मिळत असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही याला दुजोरा दिला. माझी लाडकी बहीण योजना या निवडणुकीत गेमचेंजर ठरली अशा आशयाचं मतही त्यांनी मांडलं.

वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीचा महायुतीला फायदा : वाढलेली महागाई, महिलांवरील अत्याचार अशा कारणांनी त्रस्त झालेल्या महिलांनी मतदानात मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवल्याचीही चर्चा होती. मात्र हे दावे निकाल पाहता चुकीचे ठरत आहेत. आजपर्यंतचा मागील अनुभव पाहता महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढलीय, त्याचा फायदा हा भाजपाला आणि त्यांच्या मित्र पक्षांना झालाय. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये भाजपाने मित्र पक्षांसह सरकार स्थापन केलंय, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानं मतदानाची टक्केवारी वाढली हे महायुतीला फायदेशीर होणार, असे संकेत फडणवीसांनी मतदानाची टक्केवारी पाहिल्यानंतर दिले होते. त्याचबरोबर राज्यातील महिला मतदानाची टक्केवारीसुद्धा वाढल्याने त्याचाही फायदा महायुतीला होईल, असंही ते म्हणाले होते. फडणवीस यांचे हे दोन्ही दावे या निकालावरुन खरे ठरल्याचं दिसतय.

हेही वाचा...

  1. मुख्यमंत्रिपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले...
  2. महायुतीच्या महाविजयानंतर राज्यात भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष
  3. मोठी बातमी! काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांचा पराभव; मुख्यमंत्रिपदासाठी होते दावेदार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.