नाशिक Income Tax raids : काही बिल्डर तसंच सरकारी कंत्राटदारांच्या कार्यालयांवर, घरांवर नाशिकच्या आयकर विभागानं छापं टाकले आहेत. या कारवाईत आयकर विभागाचे सुमारे 120 अधिकारी सहभागी झाले आहेत. बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास 70 वाहनांच्या ताफ्यासह आयकर विभागाचे अधिकारी नाशिकमध्ये दाखल झाले होते. त्यांनी एकाच वेळी 14 ठिकाणी छापे टाकले, तर 20 ते 25 ठिकाणी शोधमोहीम सुरू करण्यात आली. या छाप्यात अधिकाऱ्यांनी काही कागदपत्रं जप्त केल्याचे वृत्त असून अद्यापही कारवाई सुरू असल्याची माहिती मिळते आहे.
दीड महिन्यात दुसरा छापा : आयकर विभागाच्या पथकानं नाशिकच्या बांधकाम व्यवसायिकांसह अनेक उद्योजकांवर छापे टाकले आहे. आज पहाटेपासून नाशिक शहरात आयकर विभागाचं छापासत्र सुरू आहे. मुंबईसह राज्यातील आयकर विभागाच्या एकूण 120 अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. नाशिक शहरात दीड महिन्यात आयकर विभागानं टाकलेला हा दुसरा छापा आहे. त्यामुळं अनेकांचं धाबं दाणाणलं आहे. आयकर विभागाच्या धाडीत शहरातील बीटी कडलग, हर्ष कन्स्ट्रक्शन, पवार-पाटकर बिल्डर्स, सांगळे कन्स्ट्रक्शन, सोनवणे बिल्डर्स रडारवर असून, त्यांची घरे, कार्यालये आयकर अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली आहेत. अवघ्या दीड महिन्यांपूर्वी या तिघांवरही जीएसटी विभागानं कारवाई केली होती.
व्यावसायिकांमध्ये भीतीचं वातावरण : मोठ्या प्रमाणात करचोरी झाल्याच्या संशयावरून हे छापे टाकण्यात आले. या छाप्याबाबत कुणालाही माहिती मिळू नये, यासाठी मुंबई विभागाच्या प्राप्तिकर विभागानं छत्रपती संभाजीनगरनंतर नाशिकला येऊन ही कारवाई सुरू केली आहे. आयकर विभागाच्या तक्रारीवरून नाशिकमध्ये मोठे व्यापारी, कंत्राटदार असून यापूर्वीही काही बिल्डर व्यापाऱ्यांवर छापे टाकण्यात आले आहेत. बुधवारी (दि. 31) सकाळपासून पुन्हा धडासत्र सुरू झालं आहे. त्यात नागपूर आयकर विभागाच्या 42 अधिकाऱ्यांसह ३४ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एकाच वेळी शहरात छापा टाकल्यानं व्यावसायिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
राजकीय नेत्यांचा सहभाग : नाशिक जिल्ह्यातील अनेक राजकीय नेते, आमदार, खासदारांचे या मोठ्या बिल्डर आणि कंत्राटदारांशी व्यावसायिक संबंध असल्याची माहितीही समोर आली आहे. त्यातील काही बडे सरकारी कंत्राटदार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळतेय.
हे वाचलंत का :