ETV Bharat / state

पूजा खेडकर प्रकरणावर जिल्हाधिकारी सुहास दिवसे प्रथमच बोलले; म्हणाले... - IAS Pooja Khedkar

Suhas Diwase On Pooja Khedkar Case : मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर छळ केल्याचा आरोप केला होता. यावरच जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिलीय. दुसरीकडं पूजा यांचे वडील दिलीप खेडकर यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनसाठी अर्ज केला.

Pune district collector Suhas Diwase first reaction on IAS Pooja Khedkar Case
पूजा खेडकर आणि सुहास दिवसे (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 19, 2024, 1:40 PM IST

पुणे Suhas Diwase On Pooja Khedkar Case : पुणे जिल्ह्यात परिविक्षाधिन सहाय्यक जिल्हाधिकारी राहिलेल्या पूजा खेडकर यांच्यासंदर्भात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. मात्र, असं असतानाच आता पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी आपला मानसिक छळ केल्याची तक्रार पूजा खेडकरांनी केलीय. त्यामुळं या प्रकरणाला आता अजूनच वेगळं वळण मिळत असल्याचं बघायला मिळतंय. या प्रकरणावर आता सुहास दिवसे यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिलीय.

काय म्हणाले सुहास दिवसे? : पूजा खेडकर यांनी वाशिम पोलीस उपअधिक्षकांसह तीन पोलीस अधिकाऱ्यांसमोर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या छळाविषयी तक्रार दिली. तसंच पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याचंही खेडकरांनी म्हटलंय. त्यासंबंधी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी आज (19 जुलै) प्रथमच प्रतिक्रिया दिली. दिवसे म्हणाले की, "माझ्याबाबत पूजा खेडकर यांनी केलेल्या तक्रारीबाबत कोणतीही नोटीस मला प्राप्त झालेली नाही. मात्र, त्याबाबत मी योग्यवेळी बोलेल," असं जिल्हाधिकारी म्हणालेत.

प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित : वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर यांचा महाराष्ट्रातील प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित करण्यात आला. त्यांना मसुरीतील ॲकॅडमीत परत बोलावण्यात आलंय. पूजा खेडकर यांचा जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिलेत. तर लाल बहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशननं दिलेल्या निर्देशानुसार सरकारकडून ही कारवाई करण्यात आलीय. तसंच पूजा खेडकर यांना 23 जुलै 2024 पूर्वी मसूरी येथील ॲकॅडमीमध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. गुरुवारी (18 जुलै) पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना मुळशी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. तर सहआरोपी असलेले पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केलाय.

हेही वाचा -

  1. पूजा खेडकर यांच्याविरोधात कर्मचारी संघटना आक्रमक; दमदाटी केल्याचा आरोप, "कारवाई करा अन्यथा..." - IAS Pooja Khedkar Controversy
  2. पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा यांना पाचाड येथील लॉजिंगमधून पहाटे अटक, पाहा सीसीटीव्ही फुटेज - Manorama Khedkar arrested
  3. पूजा खेडकर यांचा आणखी एक कारनामा? खोटा पत्ता देऊन रेशनकार्ड मिळविल्याचा दावा - IAS Pooja Khedkar

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.