वाशिम IAS Pooja Khedkar : परिविक्षाधिन आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर झालेले आरोप, पदाचा केलेला गैरवापर, अधिकाऱ्यांना दिलेली धमकी अशा अनेक घटनांमुळं त्या चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. इतकंच नव्हे तर त्यांच्या कुटुंबियांचेही अनेक कारनामे समोर येत आहेत. यामुळं त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली. या सर्व प्रकरणात त्यांची चौकशी सुरु असतानाच त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा हातात पिस्तुल घेतलेला एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. याबाबत त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.
#WATCH | Maharashtra: Trainee IAS officer Puja Khedkar says " i will testify in front of the expert committee and we will accept the decision of the committee...i do not have the right to tell you whatever investigation is going on. whatever submission i have, will become public… pic.twitter.com/vsGISCyRho
— ANI (@ANI) July 15, 2024
काय म्हणाल्या पूजा खेडकर? : या सर्व घटनांसंदर्भात सध्या वाशिममध्ये असलेल्या पूजा खेडकर यांना माध्यमांनी सवाल विचारले. मात्र, "मी तुमच्यासमोर काहीही बोलू शकत नाही" असं म्हणत त्यांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला. तसंच "माझं जे काही उत्तरं असेल, स्पष्टीकरण असेल ते मी चौकशी समितीसमोर देईन. मी तुम्हाला काहीही सांगू शकत नाही," असं त्या म्हणाल्या. त्यांची आई मनोरमा यांच्याविरोधात दाखल झालेला गुन्हा आणि त्या फरार झाल्याबद्दलही प्रश्न विचारला असता, तेव्हाही त्यांनी उत्तर कायम ठेवलं. "मी या मुद्यावर काहीच बोलू शकत नाही. माझं जे उत्तर असेल ते मी पॅनेलसमोर सांगेन. सिव्हिल सर्व्हिसेसच्या नियमानुसार मला तुमच्यासमोर काहीच बोलता येणार नाही," हेच त्यांनी म्हटलंय.
नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्राचा वाद : पूजा खेडकर यांनी UPSC परीक्षेत पात्र होण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्रासोबतच नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र देखील जोडलं होतं. पण पूजाच्या ओबीसी नॉन क्रिमीलेयर कँडिडेट असण्यावर आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. उमेदवाराच्या वडिलांची संपत्ती 40 कोटी रुपये असेल तर त्यांच्या पाल्यांना ओबीसी नॉन क्रिमीलेयरमध्ये कसं गृहीत धरलं जाईल? असा सवाल उपस्थित होत आहे. त्याचबरोबर लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत खोट्या प्रमाणपत्राद्वारे त्यांनी हे पद मिळवल्याचा दावा करण्यात येत आहे. दृष्टिहीन आणि मानसिक आजारी असल्याचा दावा करत पूजा खेडकर आयएएस झाल्या. त्यासाठी त्यांना सहा वेळा वैद्यकीय चाचणीसाठी बोलवलं होतं. परंतु सहा वेळा त्या हजर राहिल्या नाहीत. त्याऐवजी बाहेरुन वैद्यकीय अहवाल दिला, त्यामुळे वाद निर्माण झाला होता, अशी माहिती मिळत आहे.
हेही वाचा :