ETV Bharat / state

श्रीरामाच्या दर्शनाची आस! डोळ्यांवर पट्टी, चेहरा पूर्ण झाकलेला; बाईक चालवत दोघांनी सुरू केला सोळाशे किलोमीटरचा प्रवास

Ayodhya Ram Mandir Darshan : अयोध्येत श्रीरामाचं भव्य मंदिर (Ayodhya Ram Mandir) दिमाखात उभं राहिलं आहे. या मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आलीय. त्यानंतर आता अयोध्येत जाऊन श्री रामांचं दर्शन घेण्यासाठी भक्तांनी गर्दी केलीय. अनेकजण श्रीरामाच्या दर्शनासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं जात आहे. मात्र हैदराबाद येथील दोन जादूगारांनी अयोध्येत जाऊन श्री रामांचं दर्शन घेण्यासाठी वेगळाच मार्ग निवडला आहे.

Ayodhya story
स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून बाईकवर निघाले अयोध्येला
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 27, 2024, 2:54 PM IST

Updated : Feb 27, 2024, 3:14 PM IST

डोळ्यावर पट्टी बांधून प्रवास केला सोळाशे किलोमीटरचा प्रवास

नागपूर Ayodhya Ram Mandir Darshan : प्रभू श्रीराम अयोध्येत विराजमान होऊन आता महिना लोटलाय. श्री रामाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा (Ayodhya Ram Mandir) भव्य दिव्य कार्यक्रम असंख्य भाविकांची चित्त-वृत्ती प्रसन्न करणारा ठरला. सध्या मोठ्या प्रमाणात श्री रामभक्त दररोज लाखोंच्या संख्येनं अयोध्येत दाखल होत आहेत. कुणी बसनं प्रवास करत आयोध्या नगरीत जात आहेत तर कुणी ट्रेन, विमानानं प्रवास करत श्री रामाचं मनमोहक बालरूप डोळ्यात साठवण्यासाठी अयोध्या यात्रेला निघाले आहेत.

दुचाकी चालवत निघाले अयोध्येला : हैदराबादजवळ असलेल्या शमशाबाद येथून दोन जादूगार श्रीराम दर्शनाची आस घेऊन निघाले आहेत. मात्र, त्याचा प्रवास हा जगावेगळा आहेत. दोघीही मोटारसायकलनं जरी प्रवास करतायत. यांच्या प्रवासाला आगळं वैशिष्ट्य आहे. त्यांचा प्रवास हा सामान्य नाही. हे दोन रामभक्त उघड्या डोळ्यांनी नाही तर बंद डोळ्यांनी दुचाकी चालवत निघाले आहेत. डोळ्यांवर घट्ट पट्टी बांधून मोटारसायकल चालवत अयोध्येला निघाले आहेत. मारुती जोशी आणि रामकृष्णा असं जादूगारांची नावं आहेत.

डोळ्यावर पट्टी बांधून सोळाशे किलोमीटर प्रवास : मारुती जोशी आणि रामकृष्णा हे हैदराबाद जवळील शमशाबादचे रहिवासी आहेत. डोळ्यावर पट्टी बांधून दुचाकी चालवत अयोध्येला जाण्यामागील कारण विचारलं असता म्हणाले की, शरीरातील सर्व अवयव आणि इंद्रिय व्यवस्थित काम करत असताना बरेचदा लोक रस्त्यावर बेफिकीरपणे गाडी चालवतात. त्यामुळं रस्त्यावरील अनेकांचा जीव धोक्यात येतो. रस्त्यावर डोळे आणि कान उघडे असताना देखील निष्काळजीपणे वाहन चालवण्याचा परिणाम जीवघेणा ठरतो. या उलट, ज्या दृष्टी हिरावलेले बांधव-भगिनीही स्वतःला तसंच इतरांनाही इजा होऊ न देता सुरक्षितपणे त्यांच्या गंतव्यस्थानी जातात. यासाठी त्यांना मदत करते ती त्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि उपजत संवदनक्षमता! अशाच बांधव-भगिनींबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी आम्ही दृष्टी असूनही डोळ्यांवर पट्टी बांधून दुचाकीवरुन अयोध्येपर्यंतचा प्रवास करण्याचा निश्चय केला. सोळाशे किलोमीटरचा हा प्रवास आम्ही करणार आहोत. आमचा रामराया आमच्याकडून सुरक्षित प्रवास करुन घेईल, यात आम्हाला काडीमात्र शंका नाही.

सहा महिन्यांच्या सरावानंतर प्रवास : मारुती जोशी आणि रामकृष्णा हैदराबाद जवळील शमशाबाद येथून तीन दिवसांपूर्वी निघाले आहेत. 1 मार्च रोजी अयोध्येत दाखल होण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रवासाचं नियोजन केलं आहे. रोज किमान दोनशे किलोमीटरचा प्रवास ते करतात. डोळ्यांवर पट्टी बांधून दुचाकी चालवण्यासाठी कला साध्य होण्यासाठी जोशी आणि रामकृष्णा यांनी सलग सहा ते आठ महिने सराव केलाय. त्यामुळं व्हिडिओ बघून डोळ्यावर पट्टी बांधून कुणीही दुचाकी किंवा इतर वाहन चालवण्यासाठी धाडस करू नये, असं आवाहन त्यांनी केलंय.

श्रीरामाची मूर्ती म्हणजे पवित्र मूल्यांचं पुनरुज्जीवन : सध्याच्या समाजात मानवी मूल्ये आणि नैतिक तत्त्वं नष्ट होत आहेत. अशा वेळी अयोध्येत स्थापित केलेली प्रभू श्रीरामाची मूर्ती ही रामरायाने स्थापित केलेल्या पवित्र मूल्यांचं पुनरुज्जीवन करण्याच्या दृष्टीने उचललेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे. आपल्या राष्ट्राला गतवैभव प्राप्त होण्याच्या दिशेनं मार्गक्रमण करणारं आहे. अयोध्येत श्री रामाच्या मूर्तीची स्थापना म्हणजे नवजागरण, परिवर्तन आणि प्रभू राम यांचा आदर्श आणि धार्मिक मूल्यांचं आवाहन आहे, अशी भावना या दोन श्रीरामभक्त जादूगारांनी व्यक्त केलीय.

हेही वाचा -

  1. पुण्यातून 1400 रामभक्त अयोध्येला रवाना, मोदी सरकारमुळे मंदिराचं स्वप्न साकार झाल्याचा बावनकुळेंचा दावा
  2. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा; भाजपाच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष, फटाक्यांची केली आतिषबाजी
  3. अशीही प्रभू रामाची भक्ती! महिलांच्या हातावर मेहंदीने रेखाटले रामचरित्राचे पोट्रेट, वाचा खास रिपोर्ट

Last Updated : Feb 27, 2024, 3:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.