अहमदनगर (शिर्डी) Holi Celebrated Sai Baba Temple Shirdi : आजपासून देशभरात रंगांचा सण होळीची सुरुवात होळी दहनानं होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिर्डी साईबाबांच्या (Sai Baba Temple Shirdi) गुरूस्थान (Gurusthan) मंदिरासमोर आज (24 मार्च) पारंपारिक पद्धतीनं होळीचं पुजन करून होळीचं दहन करण्यात आलं. तसंच पालथ्या हातानं शंखध्वनी अर्थात बोंब मारत मनातील अनिष्ठ प्रवृत्ती शांत होवो, अशी प्रार्थना साईबाबा संस्थान आणि भक्तांनी साईबाबांच्या चरणी केली.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्य हस्ते पुजन आणि दहन : होळीचा सण हा आज संपूर्ण भारतभर साजरा केला जात आहे. होळी साजरी करण्याची परंपरा पूर्वकाळापासून चालत आली आहे. साईबाबांच्या शिर्डीतही होळी पुजन करून दहन करण्याची प्रथा साईबाबांच्या काळापासून सुरू आहे. आज साई मंदिराजवळ गुरुस्थान समोर एरंड, फुलांची माळ, ऊस आणि पाच गौऱ्या मधात उभे करून होळीला तयार करण्यात आले आणि मध्यान्ह आरतीच्या अगोदर संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते पुजन करून दहन केले गेले.
मनातील दृष्ट प्रवृत्ती नष्ट होण्यासाठी उत्सव साजरा : मनातील दृष्ट प्रवृत्ती नष्ट होण्यासाठी आज आणि उद्याचा उत्सव साजरा केला जात आहे. आज साईबाबांच्या मूर्तीला साखरीपासून तयार केलेली गाठी घालण्यात आली. तसंच देशातील शेतकऱ्यांवरील संकट दूर होण्यासाठी भाविकांनी यानिमितानं साईबाबांना प्रार्थना केली. साईच्या शिर्डीतही सौख्य लाभावेत आणि अनिष्ठ प्रवृत्ती लोप पाव्यात यासाठी होळीचं पूजन केलं गेलं. होलिका दहनानंतर दुपारची मध्यान्ह आरती पार पडली.
हेही वाचा -
- Shirdi Saibaba Sansthan : शिर्डी साई मंदिरात उन्हापासून भाविकांचं होणार संरक्षण; साईबाबा संस्थानच्या वतीनं करण्यात 'ही' सोय
- देशभरात साजरा होतोय होळीचा सण; काय आहे शुभमुहूर्त, कधी करता येईल होळी दहन? - Holika Dahan Muhurat 2024
- ठाण्यात जादुई रंगपंचमी; होळीसाठी बाजारपेठेत "कलर लगाओ, कलर भगाओ छू मंतर" - Holi Festival 2024