नाशिक Nashik Hit and Run : नाशिकमधील गंगापूर रोड जवळील बारदान फाट्याजवळ एक महिला भाजी आणण्यासाठी जात असताना भीषण अपघात झाला. अज्ञात कारनं तिला पाठीमागून धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की, महिला बॉलप्रमाणे हवेत उडून बाजूला पडली. या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला. मात्र, घटनेनंतर कार चालकानं भरधाव वेगानं कार पळवली. हा सर्व प्रकार जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. या घटनेनंतर गंगापूर पोलीस ठाण्याचं पथक घटनास्थळी दाखलं झालंय. तसंच अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.
सीसीटीव्हीच्या मदतीनं आरोपीला तपास सुरू : "अपघाताची माहिती मिळता आम्ही घटनास्थळी पोहोचलो. त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीमध्ये एक भरधाव वेगानं येणारी गाडी रस्त्यावरच्या बाजूनं जाणाऱ्या महिलेला धडकताना दिसतेय. यात महिलेच्या जागीच मृत्यू झालाय. घटना घडल्यानंतर कारचालक फरार झालाय. मात्र सीसीटीव्हीच्या आधारे कारचालकास लवकरच आम्ही ताब्यात घेऊ", असं गंगापूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी सांगितलं.
पाठलाग करतांना ओठाकतील चालकाचा मृत्यू : एक दिवसापूर्वी नाशिकच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकासोबत हीट अँड रनची घटना घडली आहे. परराज्यातील अवैध मद्य वाहतूक करणाऱ्या क्रेटा कारचा सिनेस्टाईल पाठलाग सुरू असताना मोठा अपघात घडला. चांदवड तालुक्यातील हरनूल टोल नाक्याजवळ पथकाच्या गाडीला अवैध वाहतूक करणाऱ्या कारनं कट मारल्यानं पथकाची स्कॉर्पिओ गाडी रस्त्याच्या खाली जाऊन पलटली. या अपघातात वाहन चालक कैलास कसबेचा मृत्यू झाला. तर, पथकातील तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले असून त्यात दोन पोलिसांचा समावेश आहे. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हे वाचंलत का :