ETV Bharat / state

नागपूरमध्ये हिट अँड रन फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकानं चिरडलं, दोघं ठार - Nagpur Hit and Run - NAGPUR HIT AND RUN

Hit and Run in Nagpur : नागपुरात एका कारनं वृद्ध व्यक्तीला चिरडल्याची घटना ताजी असतानाच रविवारी रात्री एका मद्यधुंद कार चालकानं फुटपाथवर झोपलेल्या 8 जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळं सर्वत्र एकच खळबळ उडाल्याचं बघायला मिळतंय.

NAGPUR HIT AND RUN
नागपूर हिट अँड रन (Source reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 17, 2024, 1:10 PM IST

Updated : Jun 17, 2024, 1:23 PM IST

नागपूर Hit and Run in Nagpur : गेल्या काही दिवसांपासून नागपूर शहरात 'हिट अँड रन'च्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचं बघायला मिळतंय. असं असतानाच आता रविवारी रात्री एका मद्यधुंद कारचालकानं फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत दोघांचा मृत्यू झालाय. रात्री उशिरा वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या दिघोरी चौकाजवळ ही घटना घडली आहे. कारचालकाला अटक करण्यात आलीय.

विजय दिघे, पोलीस निरीक्षक, वाठोडा पोलीस स्टेशन (Source reporter)

नेमकं काय घडलं? : दिवसभर शहरातील विविध भागात फुटपाथवर खेळणी विक्रीचा व्यवसाय केल्यानंतर रोजच्या दिनक्रमानुसार काही लोक फुटपाथवर झोपले होते. उमरेडच्या दिशेनं जाणाऱ्या भरधाव कारचालकाचं कार वरील नियंत्रण सुटलं. त्यानंतर कार थेट फुटपाथवर चढली. यावेळी फुटपाथवर झोपलेले 8 जण कार खाली चिरडले गेले. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. तसंच यामध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश असल्याचं सांगण्यात आलंय.

कारचालकाला अटक : या प्रकरणात पोलिसांनी भूषण लांजेवार (वय 20) सह अन्य पाच आरोपींना ताब्यात घेतलंय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूषण लांजेवार आणि त्याचे काही मित्र पार्टी करून परतत असताना त्यांचं वेर्ना (Verna) कारवरील नियंत्रण सुटलं. त्यामुळं हा अपघात घडला. अपघातानंतर आरोपी पळून गेले होते. मात्र, पोलिसांनी दीड दोन तासांच्या प्रयत्नानंतर सर्व आरोपींना अटक केली आहे.

हेही वाचा -

  1. नागपूर हिट अँड रन हत्या प्रकरण : अर्चना पुट्टेवारचा मोबाईल फोन जप्त, धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता - Nagpur Hit And Run Murder Case
  2. पिंपरी चिंचवड शहरात हिट अँड रन; भरधाव कारनं महिलेला उडवलं, घटनास्थळावरुन पळ काढणाऱ्या पोलिसाच्या मुलाला ठोकल्या बेड्या - Pimpri Chinchwad Hit And Run Case
  3. दारू पार्ट्यांमुळे पुरुषोत्तम पुट्टेवार 'हिट अँड रन' सुपारी किलिंग हत्या प्रकरणाचा झाला उलगडा - Nagpur Murder Case

Last Updated : Jun 17, 2024, 1:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.