ETV Bharat / state

पुणे जिल्ह्यात हिट अँड रनची पुनरावृत्ती, अल्पवयीन मुलीनं दोघांना उडवलं; एकाचा मृत्यू पोलीस पाटलाच्या मुलीचा प्रताप - minor daughter hit two bike riders

Hit And Run Case Pune : एका पोलीस पाटलाच्या अल्पवयीन मुलीनं 31 मे रोजी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास मालवाहू पिकअप चालवताना दुचाकीला धडक दिली. दुचाकीवरील तीस वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अपघातात दुसरी व्यक्ती जखमी झाली आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे हा अपघात घडला आहे.

Hit And Run Case Pune
पिकअपची बाईकला धडक (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 1, 2024, 5:54 PM IST

शिरूर (पुणे) Hit And Run Case Pune : पुण्यातील हिट अँड रन प्रकरणाची देशभरात जोरदार चर्चा आहे. एका बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या मुलानं दारूच्या नशेत वेगानं आलिशान पोर्शे कार चालवत दोघांना उडवल्यानं दुचाकीवरील तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच शिरुर तालुक्यातही पोर्शे पॅटर्नची पुनरावृत्ती झाली आहे.

मोटार सायकलला समोरा समोर धडक : या प्रकरणी सतिश विठ्ठल मेमाणे (रा. वडगाव बांडे, ता. दौंड, जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. 31 मे रोजी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास मयत अरुण मेमाणे आणि त्याचा मित्र महिंद्र बांडे हे दोघे दुचाकी गाडीवर रोहित्राचे ऑइल आणण्यासाठी वडगाव बांडे येथून न्हावरेला निघाले होते. मोटार सायकल अरुण मेमाणे हा चालवित होता. त्याच्या पाठीमागे महिंद्र बांडे हा बसलेला होता. सदर मोटारसायकल अरणगाव (ता. शिरुर) येथे आली असताना त्यांच्या मोटार सायकलला पिकअप चालकाने समोरासमोर धडक दिली. यामध्ये दुचाकी चालक अरुण मेमाणे याचा जागीच मृत्यू झाला, तर महिंद्र बांडे हा जखमी झाला.

अपघातग्रस्तानांना मदत न करता काढला पळ : हा अपघात एवढा भीषण होता की, मालवाहू पिकअपने मोटार सायकलसह चालकास 20 ते 30 फूट फरफटत नेलं. हे पिकअप अरणगावाचे यांची अल्पवयीन मुलगी (अंदाजे वय 15) चालवत होती. तिच्यासोबत शेजारील सीटवर वडील बसले होते. सदर मुलीने तिच्या ताब्यातील पिकअप जोरात भरधाव वेगाने चालवत मोटार सायकलला समोरून धडक दिली. तसंच अपघात झाल्यानंतर मदत न करता त्या दोघांनीही घटनास्थळावरून पळ काढला. याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे मयत अरुण मेमाणे यांचा भाऊ सतिश मेमाणे यांनी फिर्याद दिली असून अल्पवयीन मुलीच्या वडिलांसह अल्पवयीन मुलीवर गुन्हा करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास शिक्रापूर पोलीस करत आहेत.

हेही वाचा :

  1. लोकसभा निवडणूक 2024 Live Update : आठ राज्यात 1 वाजेपर्यंत 40.09 टक्के मतदान - Lok Sabha Election 2024
  2. सलमान खानवर हल्ल्याचा आणखी एक कट; बिश्नोई गँगच्या 4 शूटर्संना अटक, हल्ल्यासाठी मागवणार होते पाकिस्तानातून शस्त्र - Salman Khan Firing Case
  3. मेळघाटातील 'मडकी' रिकामी! हंडाभर पाण्यासाठी गावकऱ्यांची वणवण - Amravati Water Scarcity

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.