ETV Bharat / state

VIDEO : गोंदियात पावसाचा कहर; इमारत कोसळल्यानं मायलेकाचा मृत्यू, नदीत डिझेल टँकर गेला वाहून - Heavy Rain in Gondia

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 10, 2024, 7:13 PM IST

Updated : Sep 10, 2024, 7:56 PM IST

Heavy Rain in Gondia : गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसानं कहर केलाय. मंगळवारी पहाटे शहरालगतच्या एका नाल्याला पूर आल्यामुळं लगतची एक दुमजली इमारत नाल्यात कोसळली. या दुर्घटनेत मायलेकाचा मृत्यू झाला. तर वाघ नदीत डिझेल टँकर वाहून गेलाय.

Heavy Rain in Gondia
गोंदियात मुसळधार पाऊस (ETV Bharat)

गोंदिया Heavy Rain in Gondia : जिल्ह्यात मंगळवारी पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. ढगफुटीसदृश्य पावसामुळं संपूर्ण जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली. मुसळधार पावसामुळं शहराजवळील फुलचूर नाल्याला पूर आला. नाल्यातील पाणी वाढल्यानं लगतच असलेली दोन मजली इमारत थेट नाल्यात कोसळली. यामुळं पाण्यात वाहून गेल्याने आईचा, तर घराच्या ढिगाऱयाखाली दबल्याने मुलाचा मृत्यू झाला.

गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस (ETV Bharat)

मायलेकाचा मृत्यू : दीपिन अग्रवाल (२७) व किरण अग्रवाल (५०), अशी मृतांची नावे आहेत, तर अनिल अग्रवाल (५२) हे या दुर्घटनेतून थोडक्यात बचावले. घराच्या ढिगाऱयाखालून दीपिन अग्रवाल याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला, तर नाल्याच्या पाण्यात वाहून गेलेल्या किरण अग्रवाल यांचा मृतदेह प्रशासनाच्या वतीने राबवण्यात आलेल्या शोधमोहिमेत आढळून आला. या दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले.

वाघ नदीत डिझेल टँकर गेला वाहून : गोंदिया जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळं प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे. मात्र, त्याकडं नागरिक दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे. मुसळधार पावसामुळं वाघ नदीला पूर आला असून, ही नदी दुथडी भरून वाहत आहे. याच नदीत एक डिझेल टँकर वाहून गेल्याची घटना मंगळवारी सकाळी ७:३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

वाघ नदीला पूर : देवरी तालुक्यातील वाघ नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. मुसळधार पावसामुळे वाघ नदीला पूर आला. असं असतानाही एका चालकाने आपला टँकर नदीपात्रातून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळं टँकर वाहून गेला.

नागरिकांच्या घरांत शिरले पाणी : गोंदिया जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले. शहरातील सखोल भागात पाणी साचून ते घरामध्ये शिरल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. घरात शिरलेल्या पाण्यामुळं जीवनावश्यक वस्तू आणि इतर साहित्यांचं प्रचंड नुकसान झालं. प्रशासनानं लवकरात लवकर घरांत शिरलेलं पाणी बाहेर काढण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली.

हेही वाचा - मराठवाड्यात पावसाच्या हाहाकारात चिमुकल्यासह ८ जणांचा मृत्यू, आज ११ जिल्ह्यांना यलो अलर्ट - Heavy Rain in Marathwada

Last Updated : Sep 10, 2024, 7:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.