ETV Bharat / state

बॉडी बिल्डिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची बेकायदेशीर विक्री, जिम व्यावसायिकाला अटक - Illegal Drugs Saller Arrested

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 5, 2024, 4:10 PM IST

Illegal Drugs Saller Arrested : बॉडी बिल्डिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या जिम व्यावसायिकाला औषधांसह अटक करण्यात पुणे पोलिसांना यश आलय. यावेळी आरोपीकडून काही इंजेक्शन आणि ब्लड प्रेशर वाढविणाऱ्या औषधी जप्त केल्या.

Illegal Drugs Saller Arrested
बेकायदेशीर औषध विक्री प्रकरण (ETV Bharat Reporter)

पुणे Illegal Drugs Saller Arrested : पुण्यात बॉडी बिल्डिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची बेकायदा विक्री करणाऱ्या जिम व्यावसायिकाला औषधांसह अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात शरीराला घातक असलेल्या मेफेंटरमाईन सल्फेट इंजेक्शन आणि काही हार्टबीटस् आणि ब्लड प्रेशर वाढवणारी औषधेही पुणे पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहेत.

पोलीस अधिकारी दशरथ पाटील जिम व्यावसायिकावर करण्यात आलेल्या कारवाईविषयी सांगताना (ETV Bharat Reporter)

इंजेक्शनच्या 13 बाटल्या जप्त : या प्रकरणात भारती विद्यापीठ पोलिसांनी आझाद मुमताज खान (वय 41, रा. आंबेगाव ) या जिम व्यावसायिकाला अटक केली आहे. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये कलम 336 आणि कलम 276 नुसार गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून शरीर शरीरसौष्ठवासाठी अनेक पुरुष हे पुढे येत विविध औषधे देखील ते घेत असतात. अशातच शरीरसौष्ठवासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत बेकायदा विक्री करणाऱ्या जिम व्यावसायिकाला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून मेफेटरमाईन सल्फेट इंजेक्शनच्या १३ बाटल्या, तसेच पाच इंजेक्शन सिरींज जप्त करण्यात आल्या आहेत.

आरोपीला घेतले ताब्यात : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ३० जानेवारीला भारती विद्यापीठ पोलिसांचे पथक हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी पोलिसांना सातारा रस्त्यावरील लोखंडी पुलाच्या अलीकडे एक व्यक्ती बॉडीबिल्डिंगसाठी अवैध पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या इंजेक्शनची विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचत आरोपी खान याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत तो जिम व्यावसायिक असून तो मेफेटरमाईंन सल्फेट या औषधांची अवैध विक्री करत असल्याचं समोर आलं.

220 रुपयांचे औषध दीड हजार ते पाच हजारांना : साधारणतः हे औषध एखाद्या रुग्णाच्या हृदयाचे कमी झालेले ठोके आणि कमी झालेला रक्तदाब वाढण्यासाठी दिले जाते; मात्र हेच औषध बॉडीबिल्डिंग करणाऱ्या तरुणांना विकले जात असल्याचं पोलिसांनी केलेल्या कारवाईतून पुन्हा समोर आलं. या औषधाच्या बाटलीची किंमत २२० रुपये आहे; परंतु, मेडिकल स्टोअरसह इतर व्यक्तींकडून ती ५००, एक हजार, दीड हजार आणि प्रसंगी पाच हजार रुपयांनाही विकली जात आहे. बॉडीबिल्डिंग करणारे तरुणही हे औषध जादा दराने विकत घेत असल्याचं समोर आलं आहे.

आरोपीला जागीच अटक : याबाबत भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील म्हणाले की, पोलिसांना माहिती मिळाली की एक इसम हा बेकायदेशीरपणे इंजेक्शन विकत आहे. त्याची माहिती घेत तात्काळ त्याला अटक करण्यात आली आणि जागेवरच पंचनामा करत गुन्हा दाखल केला आहे. त्याच्याकडून मेफेटरमाईन सल्फेट इंजेक्शनच्या १३ बाटल्या, तसेच पाच इंजेक्शन सिरींज जप्त करण्यात आल्या असून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा :

  1. वायग्रासारख्या औषधांची विक्री करण्याच्या नावाखाली अमेरिकन नागरिकांची फसवणूक, बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश
  2. Fake Cancer Medicines: कॅन्सरची बनावट औषधे विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, ८ कोटी रुपयांची औषधे जप्त
  3. धक्कादायक! ऐन कोरोनाच्या काळात कळंबमध्ये बनावट औषधांची विक्री

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.