मुंबई Mumbai Crime News : मायानगरी मुंबईत फिरण्यासाठी राज्यासह परदेशातील नागरिक दररोज येत असतात. त्याचप्रमाणं नवी दिल्लीहून मुंबईत फिरण्यासाठी आलेल्या तरुणीवर तिच्यासोबत आलेल्या एका 50 वर्षीय व्यक्तीनं बलात्कार केल्याची घटना कुलाबा परिसरात घडलीय. याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात 18 जानेवारीला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी 19 जानेवारीला आरोपीला अटक करण्यात आली असल्याची माहिती, कुलाबा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राऊत यांनी दिलीय.
हॉटेलमध्ये केलं मुलीचं लैंगिक शोषण : राहुल राठी (वय 50) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. आरोपी हा पीडित तरुणीच्या ओळखीचा आहे. त्यामुळे पीडित तरुणीच्या पालकांनी आरोपीसह आणखी एका व्यक्तीसोबत तरुणीला मुंबई फिरण्यासाठी पाठवलं होतं. 18 तारखेला कुलाबा परिसरात असलेल्या एका हॉटेलमध्ये पीडित तरुणीसह दोन पुरुष जे दिल्लीहून आले होते, ते राहत होते. 18 जानेवारीला राहुल राठीने पीडित पंचवीस वर्षीय तरुणीचं लैंगिक शोषण केलं. याबाबत मुंबई पोलिसांच्या 100 या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करून मदत मागितली असता, मुंबई पोलिसांची व्हॅन मदतीसाठी आरोपी थांबलेल्या हॉटेलवर गेली.
आरोपी आहे विवाहित : हॉटेलवर मदतीसाठी आलेल्या कुलाबा पोलिसांना घडलेली हकीकत आरोपीनं सांगितली. दरम्यान, आरोपी राहुल राठीला कुलाबा पोलीस ठाण्यात आणून पीडित तरुणीच्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. 19 जानेवारीला आरोपी राहुल राठीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने आरोपी राठीला 24 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी राहुल राठी हा विवाहित असल्याची माहिती कुलाबा पोलिसांनी दिलीय.
हेही वाचा -