ETV Bharat / state

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृतांची संख्या 16 वर पोहोचली, बड्या अधिकाऱ्याचा पत्नीसह मृतदेह कारमधून काढला बाहेर - Ghatkopar hoarding collapse News - GHATKOPAR HOARDING COLLAPSE NEWS

Ghatkopar Hoarding Collapse घाटकोपरमधील होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृतांची संख्या 16 वर पोहोचली आहे. एअर ट्रॅफिक कंट्रोलचे निवृत्त जनरल मॅनेजर यांच्यासह त्यांच्या पत्नीचा मृतदेह कारमधून काढण्यात आला आहे. होर्डिंग कोसळल्यानंतर ही कार होर्डिंगच्या लोखंडी सांगाड्याखाली अडकली होती.

Ghatkopar hoarding collapse Death
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना (Source- ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 16, 2024, 7:33 AM IST

Updated : May 16, 2024, 9:36 AM IST

मुंबई Ghatkopar hoarding collapse- मुंबईतील घाटकोपर होर्डिंग कोसळून झालेल्या मृतांची संख्या 16 वर पोहोचली आहे. एनडीआरएफच्या पथकानं होर्डिंगखाली अडकलेल्या कारमधून पती-पत्नीचे मृतदेह बाहेर काढले आहेत. मनोज चन्सोरिया (वय ६०) आणि त्यांची पत्नी अनिता चन्सोरिया (वय 59) अशी मृतांची नावे आहेत.

सोमवारी सायंकाळी सुटलेल्या वादळी वाऱ्यात पेट्रोल पंपावरील 120 x 120 फूट आकाराचे होर्डिंग कोसळले. त्यानंतर गेली दोन दिवस एनडीआरएफकडून शोधकार्य सुरू आहे. मुंबईतील घाटकोपरमध्ये वादळामुळे पडलेल्या महाकाय होर्डिंगची सर्वत्र चर्चा सुरू आहे. पालिका प्रशासनाच्या माहितीनुसार, 120 फूट लांबीच्या होर्डिंगचा पाया केवळ 4-5 फूट खोलीवर देण्यात आला होता. त्यामुळे होर्डींग कोसळण्याचे कारण कमकुवत पायादेखील असू शकतो, अशी शंका पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

48 तासांहून अधिक बचाव कार्य सुरू- घटनास्थळावरील होर्डिग्जचा सांगाडा हटवण्यासाठी आणखी सुमारे 24 तास लागतील. इथ असलेले अन्य तीन बेकायदा होर्डिंग हटवण्यासाठी आणखी सात दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यांचा आकार 80X80 फूट आहे. 48 तासांहून अधिक काळ शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. होर्डिंगच्या मलब्याखाली आणखी काही दुचाकींसह अनेक वाहने अडकली असल्याचा अंदाज अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

ही एक दुःखद घटना होती. यात 16 लोकांचा मृत्यू झाला असून बचाव कार्य पूर्ण झालं आहे. येथे पेट्रोल पंप असल्यानं बचाव कार्याला उशीर लागला. वेगवान वारे असताना होर्डिंग स्थिर राहण्याकरिता त्यांना स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र आवश्यक आहे- बीएमसी आयुक्त भूषण गगराणी

रेल्वेची जागा असल्यानं कारवाईत अडथळा- मुंबई महापालिकेचे (BMC) आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांनी 'सर्व अनधिकृत होर्डिंगवर कारवाई केली जाणार असल्याचं सांगितले. या होर्डिंग प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या भावेश भिंडे याला आणि त्याच्या इगो जाहिरात कंपनीला पालिकेने यापूर्वीचं नोटीस पाठवली होती. मात्र, ही जागा रेल्वे पोलिसांची असल्याने या होर्डिंग विरोधातील कारवाईत अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे पेट्रोल पंपाच्या होर्डिंगवर कारवाई होऊ शकली नाही. घाटकोपर येथील रेल्वे पोलिसांच्या जमिनीवरील उर्वरित तीन होर्डिंग्ज हटवल्यानंतर या मोहिमेला सुरुवात होणार असल्याचे महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सांगितलं आहे.

दुर्घटनेमागील कारण शोधण्याकरिता तज्ज्ञांची नियुक्ती- अद्याप, बीएमसीआपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी आणि एनडीआरएफची शोधमोहीम अजूनही सुरू आहे. या होर्डिंगच्या मलब्याखाली आणखी काही लोक अडकले असण्याची शक्यता सबंधित अधिकाऱ्यांकडून वर्तवण्यात आली आहे. या प्रकरणी पालिकेने मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाला नोटीस बजावून मोठमोठे होर्डिंग काढण्याचे आदेश दिले आहेत. सोबतच या दुर्घटनेमागील कारण शोधण्यासाठी पालिकेने वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूटमधील तज्ज्ञांची नियुक्ती केली आहे.

हेही वाचा-

  1. घाटकोपर दुर्घटनेत बचाव कार्य सुरू असताना पेट्रोल पंपाला आग - ghatkopar hoarding collapse
  2. घाटकोपर दुर्घटना : 'त्या' 14 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण? - Hoarding collapsed in Ghatkopar

Last Updated : May 16, 2024, 9:36 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.