ETV Bharat / state

जया शेट्टी हत्या प्रकरणात कुख्यात गँगस्टर छोटा राजनला उच्च न्यायालयाकडून जामीन, पण...

तिहार तुरुंगात कैद असलेल्या छोटा राजनला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलाया, मात्र तरीही त्याची सुटका नाही.

मुंबई उच्च न्यायालय
Mumbai High Court (ETV Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 23, 2024, 1:15 PM IST

मुंबई : जया शेट्टी हत्या प्रकरणात गँगस्टर छोटा राजनला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलाय. या प्रकरणात विशेष न्यायालयाने छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. ही शिक्षा रद्द करून जामीन देण्यासाठी त्याने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा स्थगित करून त्याला जामीन मंजूर केलाय, मात्र छोटा राजन हा पत्रकार जे. डे. हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असल्याने त्याला जामीन मिळूनही तुरुंगातच राहावे लागणार आहे. सध्या तो तिहार जेलमध्ये आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने छोटा राजनला जामीन दिलाय. जामिनासाठी एक लाख रुपयांचा बॉण्ड भरण्याचे निर्देश न्यायालयाने दिलेत.

राजनला मुंबईतील विशेष न्यायालयाकडून जन्मठेपेची शिक्षा: जया शेट्टी हत्याप्रकरणी छोटा राजनला मुंबईतील विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. एम. पाटील यांनी ही शिक्षा सुनावली होती. भादंवि कलम 302, 120 ब अंतर्गत त्याला जन्मठेप आणि एक लाख रुपयांचा दंड, अशी शिक्षा देण्यात आली होती. 2015 मध्ये छोटा राजनला परदेशात अटक करण्यात आली आणि त्यानंतर त्याचे भारतात प्रत्यार्पण करण्यात आले. तेव्हापासून त्याला तिहार तुरुंगात ठेवण्यात आलंय.

मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल: गावदेवी येथील हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी यांना छोटा राजनच्या गुंडांनी खंडणीसाठी धमकावले होते. त्यानंतर त्यांना पोलीस संरक्षण देण्यात आले होते. मात्र काही काळानंतर त्यांना देण्यात आलेले पोलीस संरक्षण काढून घेण्यात आले. विशेष म्हणजे त्याच कालावधीत 4 मे 2001 रोजी त्यांची त्यांच्या हॉटेलमध्ये घुसून गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. छोटा राजन आणि त्याच्या गुंडांविरोधात याप्रकरणी मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम मोक्काद्वारे हा खटला चालवण्यात आलाय. या गुन्ह्यातील छोटा राजनच्या इतर तीन साथीदारांना यापूर्वीच दोषी ठरवण्यात आले होते. छोटा राजन हा एकेकाळी कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमचा अत्यंत जवळचा साथीदार होता. तो दाऊदचा उजवा हात म्हणून ओळखला जायचा. मुंबईतील 1993 च्या बॉम्बस्फोटानंतर त्याच्या आणि दाऊदच्या संबंधात बिघाड झाला. त्याचे खरे नाव राजन सदाशिव निकाळजे आहे. तो सुरुवातीला राजन नायर या बडा राजन नावाने ओळखल्या जाणाऱ्या गुंडासोबत काम करीत होता.

हेही वाचा :

  1. शिवसेनेची पहिली यादी जाहीर: अमित ठाकरे vs सदा सरवणकर लढत, जाणून कोणत्या मतदार संघातून कोण मैदानात
  2. आमदारकीसाठी 'उड्या' मारणाऱ्यांची संख्या वाढली; राष्ट्रवादीच्या मुख्य प्रवक्त्याचा राजीनामा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.