ETV Bharat / state

कुख्यात गँगस्टर अबू सालेमला नाशिक कारागृहातून हलवलं; आता राजधानीत करणार मुक्काम - Abu Salem Transferred From Nashik - ABU SALEM TRANSFERRED FROM NASHIK

Abu Salem Transferred From Nashik Jail : प्राणघातक हल्ल्याची भीती असल्यानं तळोजा कारागृहातून नाशिक रोड कारागृहात हलवण्यात आलेला कुख्यात गँगस्टर अबू सालेमला आता नाशिकमधूनही हलवण्यात आलं. कुख्यात गँगस्टर अबू सालेम याला कोणत्या कारागृहात हलवण्यात आलं, याबाबतची माहिती गोपनीय ठेवण्यात आली आहे. दरम्यान न्यायालयीन कामकाजासाठी त्याला दिल्लीला नेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Abu Salem Transferred From Nashik Jail
गँगस्टर अबू सालेम (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 1, 2024, 9:59 AM IST

Updated : Aug 1, 2024, 12:22 PM IST

नाशिक Abu Salem Transferred From Nashik Jail : मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी कुख्यात गँगस्टर अबू सालेमला तळोजा कारागृहातून कमालीची गोपनीयता पाळत नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आलं होतं. त्याला या कारागृहातील अंडासेलमध्ये महिनाभर ठेवण्यात आलं. मात्र गुरुवारी रात्री ब्लॅक कमांडोसह मोठ्या पोलीस बंदोबस्तात नाशिकरोड रेल्वे स्थानकावरुन दुसरीकडं हलवण्यात आलं आहे. कुख्यात गँगस्टर अबू सालेम याला दिल्ली इथं न्यायालयीन कामकाजासाठी नेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे.

कुख्यात गँगस्टर अबू सालेमचा महिनाभरापासून मुक्काम : नाशिकरोड कारागृहातील अंडासेलमध्ये कुख्यात गँगस्टर अबू सालेम याचा महिनाभरापासून मुक्काम होता. तळोजा कारागृहातून सुरक्षेच्या कारणास्तव अबू सालेमला नाशिकच्या कारागृहात हलवण्यात आलं. अबू सालेमला एका महत्त्वपूर्ण सुनावणीसाठी कोर्टात हजर केलं जाणार आहे. त्यासाठीच कडेकोट बंदोबस्तात नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातून रेल्वेच्या माध्यमातून दिल्लीत हलवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावेळी जेलरोड परिसरासह नाशिक रोड रेल्वे स्टेशनला छावणीचं स्वरुप आलं.

अबू सालेमला दिल्लीला हलवलं : मुबंईमधील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी अबू सालेमला आज पहाटे नाशिकरोड कारागृहातून रेल्वेनं दिल्ली इथं नेण्यात आलं. यावेळी नाशिकरोड कारागृह ते रेल्वे स्थानक दरम्यान मोठा बंदोबस्त लावण्यात आला. मुबंईमध्ये 1993 साली साखळी बॉम्बस्फोट झाले. या बॉम्बस्फोटात अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेनं सर्व देश हदरला. मुंबई पोलिसांनी यातील प्रमुख आरोपी अबू सालेमला शोधून काढलं. तपासात हाच या बॉम्बस्फोटचा प्रमुख आरोपी असल्याचं निष्पन्न झालं.

सिनेसृष्टीतून अबू सालेम उकळत होता खंडणी : मुंबई सिनेसुष्टीतील मोठमोठ्या कलाकारांना, दिग्दर्शकांना धमक्या देऊन अबू सालेम खंडणी उकळत असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. यात अनेक लोकांना त्यानं ठार मारल्यानं अबू सालेमवर गुन्हे दाखल आहेत. यातील मुंबई बॉम्बस्फोट आणि इतर गुन्ह्यात न्यायालयानं त्यास कठोर शिक्षा सुनावली आहे. तर काही गुन्हे हे न्याय प्रविष्ट आहेत. यापूर्वी तो तळोजा कारागृहात होता. मात्र हल्ला होण्याच्या भीतीनं त्याच्या विनंतीवरुन त्याला नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात आलं. मुंबई इथल्या विशेष पोलीस पथकांनी आज पहाटे तीन वाजता त्याला नाशिकरोड रेल्वे स्टेशनवरुन मोठ्या बंदोबस्तात दिल्ली इथं न्यायालयीन कामासाठी नेण्यात आलं. यावेळी कारागृह ते रेल्वे स्थानकादरम्यान मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला.

अबू सालेमच्या हत्येची भीती : कुख्यात गँगस्टर अबू सालेमच्या सुरक्षेच्या कारणास्तव त्याला कुठल्या शहरात नेलं याचा अधिकृत खुलासा अद्याप करण्यात आला नाही. अबू सालेमला त्याची हत्या केली जाईल, अशी भीती आहे. त्याला न्यायालयीन कामकाजासाठी दिल्लीला हलवण्यात आलं. ज्या रेल्वेतून अबू सालेमला नेण्यात आलं, त्या रेल्वेच्या विशेष बोगीची श्वान पथकाकडून तपासणीदेखील करण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा :

  1. अबू सालेमला विशेष टाडा न्यायालयाचा दिलासा, 'ही' मागणी न्यायालयानं केली मान्य - Abu Salem Request Tada Court
  2. अबू सालेमची याचिका मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळली, उच्च न्यायालयात जाण्यासाठी 3 जुलैपर्यंतचा अवधी - Mumbai Serial Blasts
  3. वैरी मला ठार करतील; गॅंगस्टर अबू सालेमला प्राणघातक हल्ल्याची भिती, तळोजा कारागृहातून न हलवण्याची विनंती - Gangster Abu Salem

Last Updated : Aug 1, 2024, 12:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.