ETV Bharat / state

गणेशोत्सवाला कोकणात जाण्यासाठी आणखी एक गाडी, कोकणवासीयांना आकर्षित करण्यासाठी विविध पक्षांमध्ये चढाओढ - Ganeshotsav 2024 - GANESHOTSAV 2024

Konkan Railway : पश्चिम रेल्वेवरुन कोकणात जाण्यासाठी नियमित रेल्वेगाडी सुरू होण्याची प्रतीक्षा अखेर गणेशोत्सवकाळात पूर्ण झाली आहे. पश्चिम रेल्वेकडून वांद्रे टर्मिनस ते मडगाव या दरम्यान द्विसाप्ताहिक नियमित एक्स्प्रेस सुरू करण्यात आली आहे.

Ganeshotsav 2024 western railway started two trains in week  between Bandra terminus to Madgaon
वांद्रे टर्मिनस-मडगाव एक्स्प्रेस (पश्चिम रेल्वे)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 30, 2024, 10:32 AM IST

मुंबई Konkan Railway : कोकणी माणूस आणि गणेशोत्सव यांचं एक अतूट नातं आहे. गणेशोत्सवाचे दिवस जवळ येताच सोशल मीडियावर देखील अनेक मीन्स आणि व्हिडिओ व्हायरल होतात. चाकरमानी सुट्ट्या टाकून कोकणात गणपतीसाठी आपल्या गावाला जातात. असं म्हणतात चाकरमानी जेव्हा कोकणात गावाला जातात, तेव्हा जवळपास अर्धी मुंबई खाली होते. आता जवळपास अर्धी मुंबई कोकणात जाते म्हटल्यावर वाहतुकीवर देखील तेवढाच ताण असतो. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या पाहता रेल्वे दरवर्षी गणपतीसाठी ज्यादा गाड्या सोडते. यावर्षी देखील पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेनं ज्यादा गाड्यांची घोषणा केली आहे. मध्य रेल्वेनं आधीच 262 जादा गाड्यांची घोषणा केली आहे. तर, पश्चिम रेल्वेनं सुरुवातीला सात जादा गाड्यांची घोषणा केली होती. यात आणखी दोन गाड्यांची भर पडलीय.

वांद्रे टर्मिनस ते मडगाव एक्स्प्रेसला हिरवा कंदील : कोकणात जाणाऱ्या बहुतांश गाड्या या मध्य रेल्वे अंतर्गत येतात. त्यामुळं पश्चिम उपनगरात राहणाऱ्या कोकणातील चाकरमान्यांना कोकणात जाणारी ट्रेन पकडण्यासाठी दादर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस किंवा ठाणे या स्थानकांवर यावं लागते. त्यामुळं बोरिवलीहून देखील कोकणात जाणाऱ्या गाड्या असाव्यात, अशी कोकणवासीयांची मागणी होती. या मागणीनुसार गुरुवारी (29 ऑगस्ट) दुपारी 12:50 वाजता बोरिवली इथून कोकणात जाणाऱ्या गाडीला हिरवा कंदील दाखवण्यात आला.

असं असेल वेळापत्रक : ट्रेन क्रमांक 10115 वांद्रे टर्मिनस-मडगाव एक्स्प्रेस 4 सप्टेंबर 2024 पासून सुरू होणार आहे. ही ट्रेन वांद्रे टर्मिनस इथून दर बुधवार आणि शुक्रवारी 06:50 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 22:00 वाजता मडगावला पोहोचेल. त्याचप्रमाणं ट्रेन क्रमांक 10116 मडगाव-वांद्रे टर्मिनस एक्स्प्रेस 3 सप्टेंबर 2024 पासून सुरू होईल. ही ट्रेन मडगावहून दर मंगळवार आणि गुरुवारी 07:40 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 23:40 वाजता वांद्रे टर्मिनसला पोहोचेल. ही गाडी बोरिवली, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, रोहा, वीर, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी स्थानकावर थांबेल. यात एसी 2 टायर, एसी 3 टायर, एसी 3 टायर इकॉनॉमी, स्लीपर क्लास आणि सेकंड क्लास जनरल डबे असतील.

दरम्यान, नेते मंडळींकडून कोकणवासीयांसाठी सोडल्या जाणाऱ्या ज्यादा गाड्यांवर अनेकदा त्यांचे पोस्टर, बॅनर लावलेले दिसतात. लोकसभेत भाजपाला बसलेला फटका आणि एकूणच विधानसभेतील जनमत पाहता, यावर्षी सर्वच राजकीय पक्ष कोकणातील चाकरमान्यांना खुश करण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळतंय. कोकण म्हणजे ठाकरेंचा बालेकिल्ला असं म्हटलं जातं. पण, याच ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात सध्या भाजपा आपली ताकद वाढवण्याचं प्रयत्न करताना दिसतंय. या संदर्भात भाजपा नेते आणि आमदार आशिष शेलार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी 'यासंदर्भात आम्ही सविस्तर प्रसिद्धिपत्रक काढणार' असल्याचं म्हटलंय.

हेही वाचा -

  1. कणकवली रेल्वेस्थानक नव्या ‘लुक’मध्ये; नारायण राणेंच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा संपन्न - Kankavli Railway Station
  2. काय सांगता! एकाच मिनिटात कोकणात जाणाऱ्या गणपती स्पेशल ट्रेनचं तिकीट बुकिंग फुल्ल; चाकरमानी संतप्त - Ganpati Special Trains
  3. कोकणवासियांसाठी खुशखबर; गणेशोत्सवाकरिता रेल्वे चालवणार 202 स्पेशल ट्रेन, कधीपासून करता येणार आरक्षण? - Ganpati Special Trains

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.