ETV Bharat / state

अभिनेता सुबोध भावेंच्या घरी बाप्पा विराजमान! महिला अत्याचाराप्रकरणी बाप्पांच्या चरणी केली 'ही' प्रार्थना - Subodh Bhave Ganpati

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 7, 2024, 3:58 PM IST

Updated : Sep 7, 2024, 4:03 PM IST

Ganeshotsav 2024 : आज (7 सप्टेंबर) राज्यभरात लाडक्या बाप्पाचं आगमन मोठ्या थाटामाटात होत आहे. सार्वजनिक मंडळांसह घरोघरी बाप्पा विराजमान झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर अभिनेता सुबोध भावे यांच्या घरीही बाप्पांचं आगमन झालंय.

Ganeshotsav 2024 ganpati pratishthapana at actor Subodh Bhave home
अभिनेता सुबोध भावेंच्या घरी बाप्पा विराजमान (ETV Bharat Reporter)

पुणे Ganeshotsav 2024 : 'गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया'चा जयघोष, शंखनाद, ढोल-ताशा पथकांचा निनाद, नगारा आणि सनई-चौघड्यांचे मंजुळ सूर, बँड पथकाचे बहारदार वादन, पारंपरिक पेहरावातील उत्साही कार्यकर्ते अशा उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात पुण्यासह जगभरात गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या बरोबरच राजकीय नेते तसंच सिने अभिनेते, अभिनेत्री यांच्या घरी देखील बाप्पाचं आगमन झालं आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यात देखील अभिनेता सुबोध भावे यांच्या घरी आज बाप्पाचं आगमन झालं आहे.

गुलमर्ग गोंडोलाची प्रतिकृती : अभिनेता सुबोध भावे यांच्या घरी यंदा काश्मीर येथील जगप्रसिद्ध गुलमर्ग गोंडोलाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. हा देखावा माझ्या मुलांनी, पुतण्यानं, बायकोनं आणि आईनं साकारला असल्याचं सुबोध भावे यांनी सांगितलं. तसंच गणपती बाप्पाची मूर्ती माझ्या पुतण्यानं घडवली असल्याचंही ते म्हणाले.

बाप्पांच्या चरणी केली 'ही' प्रार्थना : राज्यात गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. याबाबत भावे यांना विचारलं असता ते म्हणाले की, "महिला अत्याचाराचा प्रश्न खूपच गंभीर आहे. ज्या घटना प्रत्यक्ष स्वरूपात होत असतात त्याच्यावर आपण बोलत असतो. पण ज्या महिलांना सोशल मीडियावर देखील अतिशय घाणेरड्या पद्धतीनं बोललं जात हा देखील एक प्रकारचा बलात्कारच आहे. लोकांना अक्कल यावी आणि महिला अत्याचारांविरोधान कडक शासन व्हावं. अशी मी बाप्पा चरणी प्रार्थना करतो."

सोनाली कुलकर्णीच्या घरी विघ्नहर्ता विराजमान : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरी देखील विघ्नहर्ता विराजमान झाले आहेत. महिलांवरील विघ्न दूर करण्याचं सोनालीनं बाप्पाला साकडं घातलं आहे. पिंपरीमध्ये सध्या सगळीकडं गणपती बाप्पाच्या आगमनामुळं आनंदाचं आणि जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं आहे. दरवर्षीप्रमाणे सोनाली कुलकर्णी गणेशोत्सवासाठी थेट दुबईवरुन भारतात आली आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करत तिनं महिलांवरील विघ्न दूर व्हावे, महिलांना स्वातंत्र्यानं जगता यावं, असा कायदा बनावा, असं बाप्पाला साकडं घातलं आहे.

हेही वाचा -

  1. गणपती बाप्पा मोरया! बॉलिवूडनं केलं बाप्पाचं जल्लोषात स्वागत, अक्षय आणि समांथासह 'या' स्टार्सनी दिल्या शुभेच्छा - Ganeshotsav 2024
  2. गणेशोत्सव 2024 : मुंबईकरांनो गणपती विसर्जनाला जाताना घ्या काळजी ; महापालिकेच्या मार्गदर्शक सूचना जारी - BMC Guidelines For Ganesh Immersion
  3. 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष अन् ढोल-ताशांच्या गजरात दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं आगमन - Ganeshotsav 2024

Last Updated : Sep 7, 2024, 4:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.