ETV Bharat / state

बाप्पा निघाले गावाला...अमरावतीत छत्री आणि वडाळी तलावात गणरायाचं विसर्जन, पोलिसांचा तगडा बंदोबस्त - Amravati Ganpati Visarjan

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 17, 2024, 9:14 PM IST

Amravati Ganpati Visarjan : दहा दिवसांपासून विराजमान झालेल्या श्रीगणेशाला आज भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. अमरावती शहरातील विसर्जनासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त करण्यात आला होता.

Amravati Ganpati Visarjan
अमरावतीत गणपती विसर्जनाला सुरुवात (Source - ETV Bharat)

अमरावती Amravati Ganpati Visarjan : गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत आज अमरावतीत गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यात येत आहे. शहरातील छत्री तलाव, वडाळी तलावासह वडाळी परिसरातील प्रथमेश तलावात गणपती बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन करण्यात येत आहे. अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर अमरावती शहरात आज दीड लाखांहून अधिक घरगुती गणपतींचं विसर्जन होत असून शहरातील छोट्या सार्वजनिक गणपती मंडळांच्या गणपतींचंही विसर्जन आज होत आहे.

अमरावती शहराजवळील कोंडेश्वर तलाव, वलगाव येथील पेढी नदी आणि नांदगाव पेठ जवळील दातापाडी नदीत बाप्पाच्या मूर्तींचं विसर्जन करण्यात येत आहे. तलाव परिसरात गर्दीला जाण्याची परवानगी दिली जात आहे, परंतु मूर्तीसह तलावामध्ये एक किंवा दोन व्यक्तींनाच प्रवेश दिला जातोय.

अमरावतीत गणपती विसर्जनाला सुरुवात (Source - ETV Bharat Reporter)

तलाव परिसरात जड वाहनांना प्रवेश बंदी : अमरावती शहरातील घरगुती गणेपतींचं विसर्जन सर्वाधिक प्रमाणात छत्री तलावात केलं जातं. अमरावतीकडून भानखेडा, लालखेडा, मालखेड मोगरा गावाकडे जाणारी वाहतूक आज पूर्णपणे ठप्प झाली होती. अमरावती शहरालगत असलेल्या या गावातील ग्रामस्थांना गणपती विसर्जनामुळं बडनेरा व चांदूर रेल्वे मार्गानं अमरावतीला यावं लागत होतं.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त : आज सकाळपासून गणपती विसर्जनाला सुरुवात झाली. छत्री तलाव, प्रथमेश तलाव, वडाळी तलाव येथं तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. छत्री तलावाला पूर्णतः बॅरिकेट्स लावण्यात आले असून या ठिकाणी जमावाला पोलीस व महापालिका प्रशासनाकडून मार्गदर्शन केले जात आहे. तलावालगत गणपती विसर्जनासाठी केलेल्या मोठ्या खड्ड्यांपर्यंत पोहोचण्याकरिता एक मार्ग आणि निघण्याकरिता दुसऱ्या मार्गाची व्यवस्था करण्यात आलीय. शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीदरम्यान गैरप्रकार होऊ नये, याची दक्षता म्हणून शहरातील सर्व मुख्य चौकांमध्ये पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे.

विद्यार्थ्यांचा निर्माल्य गोळा करण्याचा उपक्रम : छत्री तलाव आणि प्रथमेश तलाव या ठिकाणी पूजेतील निर्माल्य पाण्यात फेकण्यास मनाई करण्यात आली असून हे निर्माल्य एका कंटेनरमध्ये टाकण्याची व्यवस्था करण्यात आली. विद्याभारती महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकांच्या वतीनं गणपती विसर्जन स्थळी गणपतीसोबत भाविकांनी आणलेले निर्माल्य यासह प्लास्टिकच्या वस्तूंची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था करण्यात आलीय. सकाळपासूनच हा उपक्रम राबवला जात आहे.

23 सप्टेंबर पर्यंत विसर्जन : अमरावती पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या नऊ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एकूण 532 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली. या सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना विसर्जनासाठी 17 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर पर्यंत दिवस ठरवून देण्यात आला. आज 176 मंडळातील गणपतीचं विसर्जन केलं जात असून बुधवारी 148 ,गुरुवारी 117, शुक्रवारी 62 ,शनिवारी 22, रविवारी 2 आणि सोमवारला शहरातील खापर्डे बगीचा परिसरातील विदर्भाचा राजा या सर्वात मोठ्या गणरायाचं विसर्जन अग्निशमन विभागाच्या विहिरीत होणार आहे.

हेही वाचा

  1. ढोल-ताशाच्या गजरात पुणेकरांचा गणरायाला निरोप, मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात, पाहा ड्रोन व्हिडिओ - Pune Ganpati Visarjan 2024
  2. मुंबईतील 'मानाजी राजुजी चाळ गणेशोत्सव' मंडळाने जपली कबड्डीची परंपरा - Ganeshotsav 2024
  3. राज्यातील विद्यार्थ्यांची सर्वांत मोठी गणेश विसर्जन मिरवणूक; 6000 विद्यार्थ्यांचा सहभाग, पाहा व्हिडिओ - Ganpati Visarjan 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.