बुलडाणा Gajanan Maharaj 146th apparition day : संत गजानन महाराज यांचा 146 वा प्रकट दिन आज शेगावमध्ये उत्साहात साजरा होत आहे. त्यामुळं दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येनं शेगावात दाखल झाले आहेत. याच निमित्तानं सुमारे 800 भजनी दिंड्या शेगावात दाखल झाल्या आहेत.
मोफत व्हीलचेअर : मुख्य म्हणजे स्वच्छतेसाठी प्रसिद्ध असलेल्या संस्थाननं भाविकांना मोफत प्रसादाची व्यवस्था केली आहे. तसंच दर्शनाची व्यवस्था करण्याचं नियोजन करून भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची सर्व खबरदारी घेतली जात आहे. दिव्यांगांसाठी व्हीलचेअर देण्यात आले आहेत. बाळांसाठी ट्रॉलीची व्यवस्था करण्यात आली आहे. तसंच भाविकांना उन्हाची झळ बसू नये, यासाठी दर्शन परिसरात गालिचे टाकण्यात आले आहेत.
असं होणार कार्यक्रम : गेल्या रविवारपासून संस्थानमध्ये सुरू असलेल्या महारुद्रस्वाहाकाराची सांगता सोमवारी सकाळी दहा वाजता पूर्ण होणार आहे. श्रींच्या प्रकट दिनानिमित्त सकाळी 10 ते 12 या वेळेत कीर्तन होणार आहे. आज दुपारी गजानन महाराजांची जयंती साजरी होणार आहे. यावेळी भाविक मंदिरात पुष्पवृष्टी करतील. तसंच श्रींची महाआरतीदेखील करण्यात होईल. हा सोहळा पाहण्यासाठी शनिवारी प्रकट दिनाच्या पूर्वसंध्येला संतनगरीत भाविकांची मोठी गर्दी झाली होती. श्री संस्थान ते आनंद विहार भक्त निवास संकुल या नवीन पदपथावर रात्रभर दर्शनबारी सुरू होती.
अशी आहे आख्यायिका : श्री गजानन महाराज यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1878 रोजी शेगाव येथे झाला होता, असं मानलं जातं. मात्र, महाराजांच्या जन्माचा दाखला उपलब्ध नाहीय. त्यामुळं 13 फेब्रुवारी गजानन महाराजांचा प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो. श्री संत गजानन महाराज ज्ञानी, अध्यात्मिक आणि महान योगी होते. 8 सप्टेंबर 1910 रोजी महाराजांनी समाधी घेतली गजानन महाराजांचे भारताबाहेरदेखील भक्त आहेत. सातासमुद्रापलीकडील अमेरिका, इंग्लंडसह इतर देशांमध्ये गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
हे वाचलंत का :