ETV Bharat / state

'एनसीसी' कॅम्प बेतला जीवावर; रिझवी कॉलेजमधील चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू - Four NCC Students Drowned

Four NCC Students Drowned : एनसीसी कॅम्पसाठी गेलेल्या मुंबईतील रिझवी कॉलेजमधील (Rizvi College) चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (21 जून) घडली. एनसीसी कॅम्पसाठी कॉलेजमधील 37 विद्यार्थी खालापूर येथे गेले होते.

Four students drowned
चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू (ETV BHARAT Repoter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 21, 2024, 9:27 PM IST

Updated : Jun 21, 2024, 10:02 PM IST

नवी मुंबई Four NCC Students Drowned : मुंबईतील रिझवी कॉलेजमधील (Rizvi College) चार विद्यार्थ्यांचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना खालापूर तालुक्यातील वावरले येथे असलेल्या छोट्या बंधाऱ्यात शुक्रवारी दुपारी घडली. खालापूर तालुक्यातील सेंदई येथे रिझवी कॉलेजचे 37 विद्यार्थी कॅम्पसाठी आले होते. यामध्ये 17 मुलींचाही समावेश होता. ट्रेकिंग संपवून सर्वजण धवंडी नदीवरील छोट्या बंधाऱ्यात पोहण्यासाठी उतरले, तेव्हा पाण्याचा अंदाज न आल्यानं चार विद्यार्थी पाण्यात बुडाले.

चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू (ETV BHARAT Repoter)

चौघांचाही मृत्यू : घटनेची माहिती मिळताच खालापूर पोलिसांनी स्थानिक बचाव पथकाच्या मदतीनं विद्यार्थ्यांचा शोध आणि बचाव कार्य सुरू केलं. बचाव पथकानं बेपत्ता झालेल्या चौघांचा शोध घेऊन त्यांना बाहेर काढलं. मात्र, तोपर्यंत चौघांचाही मृत्यू झाला होता. एकलव्य सिंग, इशांत यादव, आकाश माने, रणत बंडा अशी या चौघांची नावे आहेत. चौघांचे मृतदेह चौक येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. या घटनेची माहिती मृताच्या नातेवाईकांना देण्यात आली असून, पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

'अशी' घडली घटना : मुंबईतील बांद्रा येथील रिझवी कॉलेजमधील 37 विद्यार्थी एनसीसी कॅम्पसाठी खालापूर येथील मोरबे साई बंधारा येथे कॅम्पसाठी आले होते. शुक्रवारी (२१ जून) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास रिझवी कॉलेजमधील एक विद्यार्थी धावरी नदीतील पोखरवाडी धरणातील पाण्यात उतरला होता. पाण्याची खोली लक्षात न आल्यानं तो बुडाला. त्याला वाचवण्यासाठी त्याचे इतर तीन मित्र देखील पाण्यात उतरले. मात्र, त्यांनाही पाण्याचा अंदाज न आल्यानं त्यांचा बुडून मृत्यू झाला.

'हे' वाचलंत का :

  1. 'नरेंद्र मोदी हेच देशातील भ्रष्टाचाराचे सरदार'; अटल सेतू कामाच्या दर्जावरुन नाना पटोलेंची टीका - Nana Patole on Atal Setu
  2. अजित पवार आले म्हणून लंगोट तरी वाचली, उशिरा आले असते तर...; अमोल मिटकरींचं रामदास कदमांना प्रत्युत्तर - Amol Mitkari On Ramdas Kadam
  3. आमदार अपात्र ठरले तर त्यांचं मतदान विधान परिषद निवडणुकीत ग्राह्य की बाद? काय सांगते घटना? - Vidhan Parishad Election 2024

Last Updated : Jun 21, 2024, 10:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.