ETV Bharat / state

मानखुर्दच्या महाराष्ट्र नगरात प्लास्टिक बॅगमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; हत्येचा संशय, परिसरात दहशत - Found Woman Dead Body - FOUND WOMAN DEAD BODY

Found Woman Dead Body : मानखुर्द परिसरात एका महिलेचा मृतदेह आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली. एका प्लास्टिकच्या गोणीत या महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.

Found Woman Dead Body
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 24, 2024, 6:54 AM IST

मुंबई Found Woman Dead Body : मानखुर्दच्या महाराष्ट्र नगरमध्ये शुक्रवारी सकाळी एका प्लास्टिकच्या बॅगेमध्ये महिलेचा अर्धवट कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. महिलेची हत्या करुन तीन ते चार दिवसांपूर्वी मृतदेह या ठिकाणी फेकण्यात आल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन ट्रॉम्बे पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकांनी गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

दुर्गंधी येत असल्यानं लागला मृतदेहाचा छडा : मानखुर्दच्या महाराष्ट्र नगरात मेट्रो दोन ब या मार्गाच्या कारशेडचं काम सुरू आहे. इथं मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आलं असून काही ठिकाणी मातीचे ढिगारे आहेत. यातील एका मातीच्या ढिगाऱ्याजवळ शुक्रवारी सकाळपासून दुर्गंधी येत होती. कामगारांनी ही माहिती वरिष्ठांना दिल्यानंतर इथं तपासणीमध्ये एका प्लास्टिक बॅगेतून दुर्गंधी येत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं.

अज्ञात आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा : कामगारांनी बॅग उघडली असता त्यात एका महिलेचा मृतदेह त्यांना दिसला. कामगारांनी तत्काळ ही माहिती पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच ट्रॉम्बे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात हत्या करुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

महिलेच्या अंगावर इमिटेशन ज्वेलरी : महिलेच्या अंगावर इमिटेशन ज्वेलरी होती. तसेच अंगावर सलवार कुर्ता होता. मात्र, मृतदेह कुजलेला असल्यानं तिची ओळख पटवणं कठीण झालं आहे. त्यामुळे महिलेची हत्या करुन तीन ते चार दिवसांपूर्वी मृतदेह इथं फेकण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत त्या आधारे पुढील तपास सुरू केला आहे.

हेही वाचा :

  1. दादर सुटकेस प्रकरणानंतर पुन्हा लगेज बॅगमध्ये आढळला मृतदेह, पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू - Thane Crime News
  2. मूकबधिर आरोपी हत्येनंतर मृतदेह सुटकेसमधून नेत होते कोकणात, रेल्वे पोलिसांनी केला भांडाफोड - Mumbai crime News
  3. अनैतिक संबंधातून पत्नीच्या प्रियकराकडून पतीची हत्या; मृतदेह सुटकेसमध्ये भरून फेकला खाडीत! - Thane crime News

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.