कोल्हापूर Shivraj Singh Chauhan : मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज कोल्हापूरला भेट दिली. यावेळी त्यांना कोल्हापुरी चप्पल खरेदी करण्याचा मोह आवरता आला नाही. शिवराज सिंह चौहान यांनी कोल्हापुरी चप्पलची मनसोक्त खरेदी केली. "महाविद्यालयीन जीवन जगत असताना कोल्हापूरला आलो होतो, तेव्हा कोल्हापुरी चप्पल खरेदी केली होती," असं त्यांनी यावेळी सांगितलं. शिवराज सिंह चौहान यांनी यावेळी भारत न्याय यात्रेवरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली.
शेतकऱ्यांना चर्चेची दारं खुली: हमीभाव कायदा आणि शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी दिल्लीच्या विषयावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना चर्चेसाठी केंद्र सरकारची दारं खुली आहेत. केंद्र सरकारनं स्वामिनाथन यांचा रिपोर्ट दिला आहे. त्यापेक्षा जास्त आम्ही शेतकऱ्यांना दिलं असून पंतप्रधान पिक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याचा प्रयत्न केंद्रातील मोदी सरकारनं केला असल्याचं चौहान यांनी यावेळी सांगितलं.
काँग्रेसचे हत्तीचे दात आहेत: ''देशात सुरू केलेल्या 'भारत जोडो न्याय यात्रे'च्या माध्यमातून काँग्रेस नेते राहुल गांधी अनेक राज्यांचा दौरा करत आहेत. दरम्या ते अनेक हिंदू मंदिरांना गाठीभेटी देत आहेत; मात्र अयोध्येत उभारण्यात आलेल्या राम मंदिराच्या उद्घाटनावेळी आमंत्रण असतानाही गांधी परिवारातील एकही सदस्य उपस्थित राहिला नाही. मग तुम्ही आताच रामभक्त कसे झाला? असा सवाल मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी उपस्थित केला. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याकडे आता काहीही राहिलेले नाही. त्यांची काहीही जमीन वाचली नाहीये. त्यांना आता बोलायला आणि करायला काहीही नाही. त्यामुळेच ते वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीका करत असल्याचंही'', मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले.
हेही वाचा:
- उत्तर प्रदेशात मोठा अपघात; पौर्णिमेनिमित्त गंगेत स्नान करण्यासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला, 7 लहान मुलांसह 15 जणांचा मृत्यू
- प्रेयसीसाठी कायपण! कामगारांच्या 'पीएफ'चे पैसे पाठवले प्रेयसीच्या खात्यावर; पर्यवेक्षकाला अटक
- 'कोळशाच्या खाणी'त कोणाच्या 'विजाया'चा 'चंद्र'? कॉंग्रेस 'प्रतिभा' राखणार की भाजपाचं 'कमळ' पुन्हा फुलणार, काय असेल समीकरण?