ETV Bharat / state

मांजरीला वाचवण्यासाठी बायोगॅसच्या खड्ड्यात उतरलेल्या पाच जणांचा गुदमरून मृत्यू; गुढीपाडव्याच्या दिवशी घडली दुर्दैवी घटना - Ahmednagar News - AHMEDNAGAR NEWS

Ahmednagar News : एका मांजरीचा जीव वाचवताना अहमदनगरमध्ये सहा जण बायोगॅसच्या खड्ड्यात (Biogas) बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. यातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय.

Ahmednagar News
मांजर काढण्यासाठी विहरीत गेले
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 9, 2024, 7:32 PM IST

Updated : Apr 9, 2024, 10:20 PM IST

मांजरीचा जीव वाचवताना पाच जणांचा मृत्यू

अहमदनगर Ahmednagar News : नगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील वाकडी गावातील धक्कादायक घटना समोर आलीय. मांजरला काढण्यासाठी शेणानं भरलेल्या विहिरीत सहा जण उतरले होते. यातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू झालाय. यात माणिकराव गोविंद काळे, (वय ६५), संदीप माणिक काळे (वय ३६), अनिल बापूराव काळे (वय ५८), विशाल अनिल काळे (वय २३), बाबासाहेब पवार (वय ३५) वर्ष हे सहा जण शेणाचा शोषखड्डा विहिरीमध्ये (Biogas Pit) अडकले होते. त्यांना काढण्याची रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आले. याप्रसंगी नेवासा पोलीस स्टेशनचे (Newasa Police Station) पोलीस अधिकारी उपस्थित होते. या घटनेमुळं नेवासा तालुक्यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी घडली घटना : वाकडी या गावात एका शेतकऱ्याने बायोगॅससाठी खड्डा खोदला होता. त्या खड्ड्यामध्ये शेणाची स्लरी तयार करण्यात आली होती. खड्ड्यात एक मांजर पडले म्हणून विशाल काळे मांजरला काढण्यासाठी खड्ड्यामध्ये उतरले आणि त्याचा गुदमरून मृत्यू झाला. ऐन गुढीपाडव्याच्या (Gudi Padwa) दिवशी ही घटना घडल्यानं परिसरामध्ये दुःख व्यक्त केलं जातंय.

गुदमरून पाच जणांचा मृत्यू : विशाल काळे काढण्याकरता दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा असे सहा लोक उतरले होते. त्यातील पाच लोकांचा जागेवर गुदमरून मृत्यू झाला. तर सहावा विजय माणिक काळेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या ठिकाणी गावातील पोलीस पाटील, नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी, तसेच या भागातील नेते विठ्ठल रावजी लंघे, तसेच तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा -

घराची भिंत कोसळल्यामुळं दोन कामगारांचा मृत्यू, दोन जखमी - Wall Collapsed In nashik

नाताळच्या सुट्ट्यामुळं पर्यटकांची राणीच्या बागेत प्रचंड गर्दी, गेट वे ऑफ इंडियावरही रीघ

PM Modi Shirdi Visit : 'भटक्या कुत्र्यांना सुरक्षित ठिकाणी...', पक्षी-प्राणी मित्राची मागणी

Last Updated : Apr 9, 2024, 10:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.