नागपूर Gun Firing In Nagpur : गोळीबार झाल्याच्या घटनेची माहिती समजल्यानंतर कपिल नगर पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी यासह नागपूर शहर पोलीस दलाचे वरिष्ठ पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते. गोळीबाराच्या घटनेत पाच ते सहा आरोपींचा समावेश असून आरोपींना हुडकून काढण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
इनोव्हातून आले आणि गोळी झाडली : गोळीबाराची घटना कपिल नगर पोलीस ठाणे हद्दीतील कामगार नगरच्या सम्राट अशोक चौक येथे घडली आहे. इनोव्हा कारने आलेल्या पाच ते सहा आरोपींनी तरुणावर गोळी झाडली. गोळीबार सोनू उर्फ बंदर नावाच्या तरुणावर झाल्याची माहिती पुढे येत आहे.
नेम हुकल्याने सोनू थोडक्यात वाचला : सोनू काल (15 मार्च) रात्री नागपूरच्या मोमीनपुरा भागात गेला होता. त्याच्या सोबत मित्रसुद्धा होता. सोनू हा गांजा आणि एमडीच्या तस्करी आणि विक्रीच्या अवैध धंद्यात सहभागी आहे. मोमीनपुरामध्ये या व्यवसायात गुंतलेला दुसरा आरोपी शादाब सोबत त्याची भेट झाली. त्यावेळी आरोपी शादाबने सोनूला त्याच्या परिसरात गांजा आणि एमडी विक्रीचा धंदा करू नको अशी धमकी दिली होती; मात्र या त्यावेळी विपरीत घडणार हे लक्षात आल्यानंतर सोनू तिथून परतला होता. त्यानंतर पहाटे शादाबने त्याच्या ५ ते ६ साथीदारांसह सम्राट अशोक चौक गाठले. तेथे सोनूला चौकात बसलेलं बघून संतापलेल्या शादाबने रिव्हॉल्व्हर काढून त्याच्यावर गोळी झाडली. मात्र, सोनूने घटनास्थळावरून पळ काढल्याने तो थोडक्यात वाचला.
सोनू निसटला पण मित्र सापडला : सोनू पळून गेल्याने आरोपीने त्याचा साथीदार शेख अमजद याला पकडून त्याच्यावर तलवारीसह धारदार शस्त्रांनी वार केले. अमजद गंभीर जखमी झाल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. यानंतर सोनू तिथे आला आणि त्याने अमजदला उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल केले.
हेही वाचा :
- ED Arrests BRS MLC Kavita : BRS नेत्या के. कविता यांना ईडीनं केली अटक, दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात 'ईडी'ची मोठी कारवाई
- Sudhir Mungantiwar : अवघ्या 27 व्या वर्षी लढवली होती लोकसभा निवडणूक; वाचा उच्चशिक्षित सुधीर मुनगंटीवार यांची राजकीय कारकीर्द
- Sanjay Shirsat : महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार? संजय शिरसाट यांचा मोठा दावा; म्हणाले, “येत्या दोन दिवसांत…”