छत्रपती संभाजीनगर Students Missed UPSC Exam : डिजिटल युगात एखादा पत्ता शोधायचा असल्यास सर्रास 'गुगल मॅप'चा वापर केला जातो. अनेकवेळा हे ॲप्लिकेशन चुकीच्याच पत्त्यावर घेऊन जात असल्याचे अनेक उदाहरणं समोर आली आहेत. त्याचाच प्रत्यय शहरात परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाही आलाय. याचा यूपीएससी परीक्षा देणाऱ्या पन्नास विद्यार्थ्यांनाही फटका बसला आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राचा पत्ता मॅपवर टाकला असता जवळपास 20 किलोमीटर दूरवरच्या महाविद्यालयात ते पोहचले. चुक लक्षात आल्यावर परत परीक्षा केंद्रावर येईपर्यंत उशीर झाल्यानं त्यांना परीक्षेपासून वंचित राहावं लागलंय. त्यामुळं विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाल्याचं दिसून आलं.
गुगल 'मॅप'चा फटका : देशभरात केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पार पडली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मराठवाड्यातून अनेक विद्यार्थी यूपीएससी परीक्षेसाठी दाखल झाले होते. वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांवर परीक्षेची सोय करण्यात आली होती. शहरात येणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्र शोधण्यासाठी गुगल मॅपचा आधार घेतला. मात्र, एकाच नावसारखे दुसरे महाविद्यालय त्यात असल्यानं विद्यार्थी दुसऱ्याच पत्यावर पोहचले. विद्यार्थ्यांच्या चूक लक्षात येताच त्यांनी लगेच मूळ केंद्राकडं धाव घेतली. मात्र, तोपर्यंत परीक्षा सुरू झाल्यानं त्यांना परीक्षा देता आली नाही. जवळपास पन्नास मुलांना गुगल मॅपचा फटका बसलाय.
सारख्या नावामुळं झाला घोळ : समर्थनगर येथील विवेकानंद महाविद्यालयात परीक्षा केंद्र ठेवण्यात आलं होतं. जालना, बीड या जिल्ह्यासह वेगवेगळ्या जिल्ह्यातून परीक्षार्थी शहरात आले होते. त्यावेळी परीक्षा केंद्र शोधण्यासाठी त्यांनी गुगल मॅप ॲप्लिकेशनचा वापर केला. त्यावेळी वाळूज येथील विवेकानंद शाळेचा पत्ता त्यात दाखवण्यात आला. दोन्ही महाविद्यालयातील अंतर जवळपास 20 किलोमीटर आहे. चूक लक्षात आल्यावर परत येण्यासाठी अर्धा तासहून अधिकचा वेळ गेला. त्यामुळं परीक्षा केंद्रावर परीक्षार्थींना उशीर झाला. त्यामुळं जवळपास 50 विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावं लागलं. यावेळी अनेक विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले होते.
'हे' वाचलंत का :
- मुंबई उत्तर पश्चिम निवडणुकीत ईव्हीएमचे हॅकिंग? काँग्रेसनं निवडणूक आयोगाला विचारले 'हे' दोन प्रश्न - Mumbai North West election
- मोहन भागवत-योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा, लोकसभेतील खराब कामगिरीनंतर काय होणार बदल? - Yogi Adityanath meet Mohan Bhagwat
- "चंद्राबाबूंनी उमेदवार दिल्यास पाठिंबा देऊ, भाजपाला लोकसभा अध्यक्षपद मिळालं तर..."- संजय राऊत - Lok Sabha speaker election