ETV Bharat / state

अभियंत्याचा डेंग्यू सदृश्य आजारानं मृत्यू: डेंग्यूच्या रुग्णात प्रचंड वाढ, जाणून घ्या लक्षणं आणि उपाययोजना - Dengue Increased In Nashik - DENGUE INCREASED IN NASHIK

Dengue Increased In Nashik : नाशिक परिसरात मोठ्या प्रमाणात डेंग्यूच्या रुग्णात मोठी वाढ झाली आहे. शहरातील एका अभियंत्याचा डेंग्यू सदृश्य आजारानं मृत्यू झाला आहे. एका आठवड्यात तब्बल 75 डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत.

Dengue Increased In Nashik
संग्रहित छायाचित्र (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 13, 2024, 12:10 PM IST

नाशिक Dengue Increased In Nashik : शहरात मागील चार महिन्यापासून डेंग्यूचा कहर सुरू आहे. शहरामध्ये हजारो डेंग्यू सदृश्य आजाराचे रुग्ण उपचार घेत आहेत. अशात एका युवक अभियंत्याचा डेंग्यूसदृश्य आजारांनं मृत्यू झाल्यानं आरोग्य विभाग खडबडून जागा झालाय. मागील आठवड्याभरात नाशिक शहरात 75 डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत.

नाशिक शहरात डेंग्यू आजाराचा कहर : नाशिक शहरात डेंग्यू आजारानं कहर केला आहे. मागील चार महिन्यापासून सातत्यानं डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्यानं महानगरपालिकेच्या आरोग्य विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. मे महिन्यापासून डेंग्यूची रुग्णसंख्या वाढत आहे. कडक उष्णतेमुळे फ्रीज आणि एसीचा वापर वाढल्यानं त्यामागील साचलेल्या पाण्यामध्ये डेंगू डासांची उत्पत्ती होत असल्याचा दावा महानगरपालिकेने केला. अशात जोपर्यंत जोरदार पाऊस होणार नाही, तोपर्यंत डेंग्यू आजाराचं निर्मुलन होणार नाही, असं महानगरपालिकेने म्हटलं होतं. मात्र जोरदार पाऊस होऊन सुद्धा डेंग्यू आजाराचे रुग्ण सातत्यानं वाढत आहेत. मे महिन्यात ते 33 तर जून महिन्यात 161 तर जुलै महिन्यात तब्बल डेंग्यूचे 434 रुग्ण आढळून आले. यात ऑगस्ट महिन्यात 303 रूग्णांची भर पडली. तर आठ महिन्यात चिकनगुनिया आजाराचे चाळीस रुग्ण आढळून आलेत.

औषध फवारणी ठेकेदारांवर कारवाई करा : नाशिक "महानगरपालिकेचा वैद्यकीय विभाग काय करते, याची चौकशी झाली पाहिजे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी खासगी रुग्णालयात जाऊन डेंग्यू नियंत्रणासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कागदावर औषध फवारणी केली जात असून अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाकले पाहिजे," असं भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी म्हटलं आहे.

नागरिकांनी ही घ्यावी काळजी : "नागरिकांनी देखील डेंग्यूचा प्रसार होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. डेंग्यूच्या डासांची चांगल्या पाण्यातून उत्पत्ती होते. त्यामुळे घरातील पाणी देखील अलटून-पालटून बदलणं गरजेचं आहे. त्यामुळे स्वतःहून डासांची उत्पत्ती होणार नाही," असं महानगरपालिका मलेरिया विभागाचे मुख्य अधिकारी डॉ नितीन रावते यांनी सांगितलं.

हे आहेत उपाय : डासांपासून वैयक्तिक संरक्षणासाठी मच्छरदाणीचा वापर करावा, डास प्रतिबंधात्मक मलम वापरा, खिडक्यांना बारीक जाळी बसवणं, अंग झाकून राहतील असे कपडे वापरावेत, गप्पी मासे हे डासांच्या आळ्या खातात, त्यामुळे पाण्याचे मोठे हौद, विहीर इत्यादी ठिकाणी गप्पी मासे टाकावेत, त्यामुळे डासांच्या आळ्या होणार नाहीत.

ही आहेत डेंग्यूची लक्षणे : डेंग्यूचा डास चावल्यानंतर सहा ते सात दिवसानंतर रुग्णाला तापाची लक्षणं दिसायला लागतात. ताप, अंगदुखी, अंगावर पुरळ, डोकेदुखी अशी लक्षणं दिसतात. अशावेळी त्वरित रक्ताची तपासणी करून घ्यावी. डेंग्यूचं निदान झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषध उपचार करावा.

हेही वाचा :

  1. रक्तातील प्लाझ्माची घसरण डेंग्यू रुग्णांसाठी ठरू शकते घातक - Dengue Plasma Leakage
  2. नाशिकमध्ये डेंग्यूचं थैमान! महानगरपालिकेकडून रुग्णसंख्या लपविण्याचा प्रयत्न, जाणून घ्या नेमका आकडा किती? - Dengue Cases In Nashik
  3. नाशिकमध्ये पंधरा दिवसात डेंग्यूचे 200 रुग्ण; महानगरपालिकेकडून 12 हजार घरांची तपासणी - 200 Dengue Cases In Nashik

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.